आरोग्य शिबिरांचा लाभ घेवून नागरिकांनी आरोग्य अबाधित ठेवावे – आ. आशुतोष काळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आरोग्य शिबिरांचा लाभ घेवून नागरिकांनी आरोग्य अबाधित ठेवावे – आ. आशुतोष काळे

  कोपरगाव प्रतिनिधी:-  मागील वर्षापासून कोरोना संकटाचा सामना करीत आहे. नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना केल्य...

 कोपरगाव प्रतिनिधी:- 


मागील वर्षापासून कोरोना संकटाचा सामना करीत आहे. नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना केल्यामुळे कोपरगाव तालुक्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले. परंतु कोरोना पेक्षाही घातक आजार असून याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. त्यासाठी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेवून आपले आरोग्य अबाधित ठेवावे असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.



   कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आर्यन ग्रुप व संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्वरोग निदान शिबिराचे उदघाटन आमदार. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आर्यन ग्रुपने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासून सामाजिक उपक्रम राबविले आहे त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी आर्यन ग्रुपचे संस्थापक व त्यांच्या सदस्यांचे कौतुक केले. कोपरगाव शहराच्या विविध भागात अनेक विकासाच्या समस्या आहेत त्याप्रमाणे प्रभाग क्रमांक १० मध्ये देखील विकासाच्या अनेक समस्या आहेत. या समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत तुमच्या प्रभागातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक निवडून द्या. विकासाची जबाबदारी मी घेतो व तुमच्या प्रभागाच्या विकासाच्या समस्या सोडविण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देईल अशी ग्वाही दिली.  


                यावेळी नगरसेवक मंदार पहाडे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, बाळासाहेब रुईकर, आर्यन ग्रुपचे संस्थापक जावेद शेख, वाल्मिक लहिरे,चंद्रशेखर म्हस्के, धनंजय कहार, इम्तियाज अत्तार, शफीक शेख, एकनाथ गंगूले, योगेश नरोडे, राजेंद्र आभाळे, दिनेश पवार, अॅड. मनोज कडू, शुभम लासुरे, डॉ. बागडे, डॉ. गंगवाल, आर्यन ग्रुपचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.


      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत