कोपरगाव प्रतिनिधी :- भारतीय जनता पक्षाच्या सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्यातून वर्षानुवर्षे मुलभुत सुविधांपासून वंचित राहिलेला शहर...
कोपरगाव प्रतिनिधी :-
भारतीय जनता पक्षाच्या सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्यातून वर्षानुवर्षे मुलभुत सुविधांपासून वंचित राहिलेला शहरालगतचा त्रिशंकू भाग कोपरगाव शहराला जोडला गेला, त्यामुळे येथील नागरीकांना विविध सोयी उपलब्ध होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेला हा प्रश्न मार्गी लावल्याबददल सौ कोल्हे यांचे
येथील रहिवाशाच्या वतीने मनपुर्वक आभार मानत असल्याचे प्रतिपादन श्री प्रसाद आढाव यांनी केले.कोपरगाव शहरालगत असलेला गोकुळनगरी,जुना टाकळी रोड, मुरशतपुर शिवरस्ता, आढाव वस्ती,शेख वस्ती, साबळे वस्ती, नरोडे वस्ती,कर्मवीर नगर, ओमनगर, गवारेनगर, कोपरगाव ब्रँच शाळेजवळील परिसर, द्वारकानगरी, कोपरे वस्ती,नवीन टाकळी रस्ता, धोंडीबानगर, बागुल वस्ती, येवला रोड शेतकी फाॅर्म आदी परिसर कोपरगाव शहरालगत असुनही याचा समावेश पालिका हद्दीत होत नव्हता तसेच शेजारील ग्रामपंचायतमध्येही या भागाचा समावेश नसल्याने मुलभुत सुविधा अभावी येथील नागरीक वर्षानुवर्षे वंचित राहिलेले आहे. ही बाब ओळखून सौ स्नेहलता कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा करून त्रिशंकू भाग पालिका हददीत समावेश केला. वर्षानुवर्षे मुलभुत सुविधांपासून वंचित राहिलेल्या येथील नागरीकांना पालिकेमार्फत आता रस्ते,पाणी, गटार, पथदिवे, आदी विकासकामे मार्गी लागत असून उर्वरित कामांसाठी विकास निधीची उपलब्धता करण्यासाठी सातत्याने स्नेहलता कोल्हे प्रयत्नशील असल्याचे प्रसाद आढाव यांनी शेवटी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत