गुहा/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील गुहा येथील प्रेरणा पतसंस्थेचे संचालक आप्पासाहेब बाप्पू चंद्रे( वय 42) यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची...
गुहा/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील गुहा येथील प्रेरणा पतसंस्थेचे संचालक आप्पासाहेब बाप्पू चंद्रे( वय 42) यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली.
आप्पासाहेब चंद्रे गुरुवारी सायंकाळी ५ वाजता गुहा ते राहुरी प्रवास करीत असताना राजश्री हॉटेल जवळ खड्यात आदळून ते गँभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल केले. मात्र रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
आप्पासाहेब चंद्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्षपदापासून कामाची सुरुवात केली होती. प्रेरणा पतसंस्थेचे दहा वर्षेपासून संचालक पदावर कार्यरत होते.
स्वाभावाने मनमिळावू व धडाडीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची सर्वदुर ओळख होती. त्यांच्या निधनानंतर प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सुरेश वाबळे यांनी शोक व्यक्त केला. चंद्रे यांच्या पार्थिवावर सकाळी 11.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत