सात्रळ/वेबटीम:- सततच्या पावसामुळे उद्वस्थ होत असलेल्या बळीराजाला सरकारने सरसगट भरपाई देण्याची मागणी सात्रळ सोनगाव धानोरे पंचक्रोशी तील...
सात्रळ/वेबटीम:-
सततच्या पावसामुळे उद्वस्थ होत असलेल्या बळीराजाला सरकारने सरसगट भरपाई देण्याची मागणी सात्रळ सोनगाव धानोरे पंचक्रोशी तील शेतकरी विखे कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू, वसंतराव डुकरे, रमेशराव पन्हाळे,सोनगाव चे उपसरपंच किरण अंत्रे, प्रकाशराव ताठे, संजय नागरे, राजेंद्र अनाप, बाळासाहेब सर्जेराव दिघे, सुभाषराव गागरे, बिपीन ताठे व इतर शेतकऱ्यांनी केली असून लवकरच परिसराचे खासदार डॉ. सुजयदादा विखेपाटील यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले.
माघील काही दिवसापूर्वी कमी दाबाच्या पट्टयामुळे निर्माण झालेले वादळांमुळे झालेली पर्जन्यवृष्टी, आत्ता परतीच्या पावसामुळे रोज येणारा पाऊसामुळे बळीराजा चिंतीत पडला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. अतिवृष्टी मुळे परिसरातील बाजरी, सोयाबीन, कपाशी, भाजीपाला, फळबागा उद्वस्त होत आहेत. अनेक ठिकाणी उभ्या बाजरीपिकाला व सोयाबीन च्या शेंगांना मोड फुटलेले असून, कपाशीचे बोन्डे ही काळे पडलेली आहेत, अर्धवट उमललेल्या बोन्डात काळा पडलेला कापूस, सततच्या ढगाळ वातावरणामुळे परिपक्व फळांवर तसेच झाडांवर बुरशी आढळून येत असल्यामुळे बाजार भाव पडण्याची शक्यता बळीराजा बोलून दाखवत असून मोठा आर्थिक फटका बसण्याची स्तिथी झाली आहे. दुसरीकडे रोजच्या पावसामुळे शेतमजुरांनाही काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
सरकारने तातडीने नुकसान भरपाईचे पंचनामे करून सरसकट भरपाई देण्याची मागणी व्यतीत झालेले शेतकरी करत आहेत. या भागाचे लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या सदर मागणीसाठी सरकार दरबारी आपले वजन वापरून तातडीने बळीराजाला मदत मिळवून देण्याची मागणी सर्वत्र होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत