किक बॉक्सिंग निवड चाचणीत राहुरीतील अमित किक बॉक्सिंग अकँडमीचे घवघवीत यश - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

किक बॉक्सिंग निवड चाचणीत राहुरीतील अमित किक बॉक्सिंग अकँडमीचे घवघवीत यश

  राहुरी प्रतिनिधी,  अहमदनगर जिल्हा अम्युचर स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिशन तर्फे कँडेट व ज्युनियर निवड चाचणी स्पर्धा २०२१ नुकतीच अहमदनग...

 राहुरी प्रतिनिधी, 

अहमदनगर जिल्हा अम्युचर स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिशन तर्फे कँडेट व ज्युनियर निवड चाचणी स्पर्धा २०२१ नुकतीच अहमदनगर येथे घेण्यात आल्या.

       त्यात राहुरी येथील अमित किक बॉक्सिंग अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालूक्यातील सुमारे दोनशे मुले सहभागी झाले होते. त्यामध्ये राहुरी येथील आशिष जाधव व आदित्य टेमकर यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली. तर शिवम पोपळघट, साद शेख, देवांश लोखंडे यांनी रजत पदक पटकावले. यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक अमित सर, स्वप्निल सर, धनंजय सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्व खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल तालूक्यातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत