संवत्सर व्हाया बिरोबा चौक ते कान्हेगांव रस्त्याची चाळण!! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संवत्सर व्हाया बिरोबा चौक ते कान्हेगांव रस्त्याची चाळण!!

कोपरगाव प्रतिनिधी:-     संवत्सर व्हाया बिरोबा चौक ते कान्हेगांव या रस्त्याची अक्षरक्षः चाळणी झाली असुन हा रस्ता आहे की खडडा आहे असा प्रश्न य...

कोपरगाव प्रतिनिधी:-


   संवत्सर व्हाया बिरोबा चौक ते कान्हेगांव या रस्त्याची अक्षरक्षः चाळणी झाली असुन हा रस्ता आहे की खडडा आहे असा प्रश्न यावरून वाहतुक करतांना पडतो, रस्ता करण्यासाठी टाकलेली खडी खडडयात गायब झाली आहे त्यामुळे येथे पाउस पडला की, डबके तयार होतात अशाही परिस्थितीत वाहनधारक जीव मुठीत धरून प्रवास करत आहे तेव्हा या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी पादचा-यासह असंख्य वाहनधारकांनी केली आहे.खडडेयुक्त रस्त्यामुळे येथुन प्रवास करणा-यांचे हाल होवुन अपघातात कुणांचे हात, पाय, कंबरडे मोडले, डोके फुटले, काहींना इहलोकाची यात्रा करावी लागली तेव्हा हा रस्ता सुरळीत होणार की नाही की हे राम म्हणत या रस्त्याचे प्रवास करावयाचा अशी धडकी भरत आहे. या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे तितकेसे लक्ष देण्यात आलेले नाही.. त्याचप्रमाणे जुन २०१९ मध्ये वनीकरण अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यांच्या कामासाठी २५ लाख रूपयांचा खर्च करण्यात आला पण बहुतांष ठिकाणी झाडांचा पत्ताच नाही. 




कोरोना परिस्थितीमुळे शाळा महाविद्यालये बंद होती त्यामुळे शालेय प्रवासी वाहनांची येथुन ये जा बंद होती. तर या परिसरात नव्याने नागपुर मुंबई समृध्दी महामार्गाचे काम सुरू आहे. त्याच्या अवजड वाहतुकीचा सामना या रस्त्यास करावा लागत आहे त्यामुळे येथे खडडयांचे प्रमाण मोठे असल्याचे अनेकजण सांगतात. विशेष करून कान्हेगांव साकरवाडी येथे गोदावरी बायोरिफायनरी प्रकल्प असुन येथे अन्य वाहनांची ये जा सुरू असते. दुचाकी प्रवाशी वाहतुकदारांना या रस्त्यातील कुठला खडडi चुकवायचा असा प्रश्न पडतो. पायी चालणा-यांना खडडयात रस्ता आहे की, रस्त्यात खडडे आहे याचा प्रतिशोध घ्यावा लागतो. या रस्त्यावरून संवत्सर, वारी कान्हेगांव येथे शाळेसाठी तसेच कोपरगांव येथे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यांसाठी ये जा करणा-या मुलांची वाहने नेहमीच नादुरूस्त होतात. त्यांच्या सायकल दुरुस्तीबरोबरच दुचाकीचे खर्च वाढले आहे त्याचे बजेट अनेक पालकांच्या खिशाला परवडत नाही त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करू नको असे म्हणण्यांची पाळी आली आहे. तेंव्हा संबंधीत यंत्रणेने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून वाहनधारकांना दिलासा द्यावा अन्यथा समृध्दी महामार्गाचे काम करणा-या गायत्री कंन्स्ट्रक्शनने सदरचा रस्ता पुर्ववत करावा अशी असंख्य वाहनचालकांची मागणी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत