कोपरगाव(वेबटीम):- कोपरगाव शहरात बेकायदेशीर रित्या दारू विक्री करणऱ्या एका विरुध्द गुन्हा दाखल करून १३८०रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. न...
कोपरगाव(वेबटीम):-
कोपरगाव शहरात बेकायदेशीर रित्या दारू विक्री करणऱ्या एका विरुध्द गुन्हा दाखल करून १३८०रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नवनाथ बाळु कुऱ्हे, वय-24 वर्षे, रा.गारदानाला, औद्योगिक वसाहत ता.कोपरगांव) हा गारदानाला येथील हॉटेल वज्रेश्वरीचे आडोशाला विनापरवाना बेकायदेशीर दारू विक्री करत असल्याची माहिती मिळताच कोपरगावचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या पथकाने छापा टाकून 300/-रु.किं.च्या इम्पेरिअल ब्ल्यु कंपनीची विदेशी दारु 180 मि.ली.च्या 02 बाटल्या तसेच 1080/-रु.कि.च्या देशी सत्रा भिंगरी कंपनीची दारु 180 मि.ली.च्या 18 बाटल्या असा एकूण 1380 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल बाळु भाऊराव धोंगडे यांच्या फिर्यादिवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत