मनुष्य शारीरिक, मानसिक, सामाजिकदृष्ट्या सुदृढ असणे गरजेचे : वासुदेव देसले - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मनुष्य शारीरिक, मानसिक, सामाजिकदृष्ट्या सुदृढ असणे गरजेचे : वासुदेव देसले

कोपरगाव/प्रतिनिधी:- मनुष्य शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या सुदृढ असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कोपरगाव शहराचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसल...

कोपरगाव/प्रतिनिधी:-


मनुष्य शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या सुदृढ असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कोपरगाव शहराचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी केले.


कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार कोपरगाव पोलीस ठाण्यात शनिवारी (ता.९) आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

डॉ.गावडे यांच्यासह सहकाऱ्यांनी तेजस्विनी हेल्थकेअर यांच्या मार्फत कोपरगाव शहर पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, गृहरक्षक दल व त्यांचे कुटुंब यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मनुष्याने शारीरिक स्वास्थ्यासह मन शुद्धीकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत