राहुरी(वेबटीम) देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या मुख्याधिकारीपदी परिक्षाविधिन स्नेहा प्रकाश भोसले यांनी सहा आठवड्यासाठी पदभार स्वीकारला असुन ...
राहुरी(वेबटीम)
देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या मुख्याधिकारीपदी परिक्षाविधिन स्नेहा प्रकाश भोसले यांनी सहा आठवड्यासाठी पदभार स्वीकारला असुन मुख्याधिकारी अजित निकत हे या कालावधित रजेवर राहणार आहेत.
देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या मुख्याधिकारीपदी प्रशिक्षणार्थी म्हणून भा.प्र.से स्नेहा प्रकाश भोसले यांनी पदभार स्वीकारला आहे.भोसले यांच्याकडे नगर पालिकेचा मुख्याधिकारीपदाचा पदभार सहा आठवडे राहणार आहे. 12 आँक्टोबर 2020 रोजी सेवेत दाखल झाल्या आहेत.त्यांनी प्रशिक्षणार्थी काळात म्हैसुर, पुणे,जळगाव, मुंबई, नाशिक आदी विभागात प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले आहे.
देवळाली प्रवरा नगर पालिका स्वच्छता अभियनात उल्लेखनीय काम असल्याने या नगर पालिकेत नविन शिकायला मिळेल.चांगले काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. प्रशिक्षणार्थी सहा आठवड्याचा कालावधी असुन या कालावधीत मुख्याधिकारी अजित निकत रजेवर राहणार आहे.
देवळाली प्रवरा शहराच्या वतीने नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी भा.प्र.से.स्नेहा भोसले यांचे स्वागत केले. तर मुख्याधिकारी अजित निकत यांनी स्वागत करुन पदभार हस्तांतर केला आहे. यावेळी कार्यालयीन अधिक्षक बन्सी वाळके, ग्रंथपाल संभाजी वाळके, अभियंता सुरेश मोटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत