देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :- नगर पालिका क्षेञातील गुंठेवारी नियमित करण्यासाठी देवळाली प्रवरा नगर पालिकेचे नगरसेवक अदिनाथ कराळे यांनी र...
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :-
नगर पालिका क्षेञातील गुंठेवारी नियमित करण्यासाठी देवळाली प्रवरा नगर पालिकेचे नगरसेवक अदिनाथ कराळे यांनी राज्यमंञी ना.प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पाठपुरावा केल्याने ना.तनपुरे यांनी गुंठेवारी प्रकरणात लक्ष घालुन सुधारीत शुल्क निश्चित करुन गुंठेवारी विकास नियमित करण्यात आला. त्यामुळे गुंठेवारी धारकांना दिलासा मिळाला आहे.गुंठेवारी धारक नागरिकांनी नगरसेवक अदिनाथ कराळे यांची भेट घेवून आभार मानले आहे.
गेल्या अनेक वर्षा पासुन गुंठेवारी विकास नियमित करण्याचा प्रश्न भिजत पडला होता. देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीतील राहुरी फँक्टरी भागात सर्वाधिक गुंठेवारी क्षेञ आहे.या भागातील नागरिकांना गुंठेवारी विकास नियमित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतू त्यास यश आले नाही. याभागातील नगरसेवक अदिनाथ कराळे यांनी ना.तनपुरे यांच्याकडे पाठपुरावा करुन हा प्रश्न धसास नेला आहे.
महाराष्ट्र गुंठेवारी अधिनियमाच्या अनुषंगाने कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र गुंठेवारी अधिनियम लागू करण्यात आला आहे. त्यानुसार गुंठेवारी नियमित करण्या करिता डिसेंबर २०२० पर्यंतच्या येलो झोन मधील अनधिकृत बांधकामांना अधिकृत दर्जा मिळाला पण अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी काही कारणास्तव ह्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातील मुदतवाढ देण्यात आलेली आहे. गेल्या पाच ते दहा वर्षा पूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी गुंठेवारी अधिनियमाची अंमलबजावणी बंद केली असल्याने कोणत्याही नगरपालिका क्षेत्रातील येलो झोन मधील अनधिकृत बांधकामे अजून ही प्रलंबित आहेत. ना. प्राजक्त दादा तनपुरे यांच्या निदर्शनास नगरसेवक कराळे यांनी आणून दिली. त्यांनी तात्काळ या संबंधी जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते.
राज्याच्या नगारविकास विभागाच्या अवर सचिव वीणा मोरे यांनी सुधारीत आदेश काढुन नगर पालिका क्षेत्रातील गुंठेवारी नियमित करण्यासाठी सुधारीत शुल्क निश्चित करण्यात आले आहे. हे शुल्क भरुन गुंठेवारी विकास नियमित करण्यात येणार आहे. यामुळे गुंठेवारीधारकांना दिलासा मिळाला आहे.
गुंठेवारीधारकांनी नगरसेवक कराळे यांचे मानले आभार
गेल्या अनेक वर्षापासुन गुंठेवारी नियमित करण्यासाठी धडपड सुरु होती.परंतू गुंठेवारी नियमितकरणाला यश मिळाले नाही. नगरसेवक अदिनाथ कराळे यांनी गुंठेवारी नियमित करण्यासाठी ना.तनपुरे यांच्याकडे पाठपुरावा करुन गुंठेवारी नियमितकरण प्रकरण धसास लावले याबद्दल गुंठेवारीधारक नागरिकांनी नगरसेवक अदिनाथ कराळे यांच्या बरोबर ना.प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत