आरपीआय आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे शुक्रवारी नगर जिल्हा दौऱ्यावर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आरपीआय आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे शुक्रवारी नगर जिल्हा दौऱ्यावर

राहुरी(प्रतिनिधी):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे शुक्रवार दि २२ ऑक्टोबर रोजी अहमदनगर जिल्हा दौऱ्य...

राहुरी(प्रतिनिधी):-


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे शुक्रवार दि २२ ऑक्टोबर रोजी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येणार असून राहुरी व नेवासा तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी दिली.

 

  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचा नगर जिल्ह्यात झंझावत सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे असून आरपीआय आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या शुक्रवार २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता राहुरी तालुक्यातील सोनगाव व परिसरातील गावात शाखा उद्घाटन संपन्न होऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. 

त्यानंतर श्रीरामपूर येथे कार्यकर्त्यांचा सन्मान स्वीकारून नेवासा येथे सायंकाळी ७ वाजता कार्यकर्त्यांशी संवाद साधून नेवासा येथे मुक्कामी असणार आहे. शनिवार २३ ऑक्टोबर रोजी नेवासा येथे  राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे पत्रकारांशी संवाद साधणार आहे.त्यानंतर औरंगाबादकडे रवाणा होणार आहे.



राहुरी व नेवासा तालुक्यातील कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, उत्तर जिल्हाध्यक्ष राकेश कापसे, जिल्हा सचिव राजन ब्राम्हणे, युवक जिल्हाध्यक्ष जितू पाटोळे, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील वाघमारे,  जिल्हा संघटक दिनेश पलघडमल, नेवासा तालुकाध्यक्ष विजय शिरसाठ, नेवासा कार्याध्यक्ष दीपक गायकवाड , राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे,  तालुका उपाध्यक्ष रमेश पलघडमल, राहुरी तालुका युवक अध्यक्ष प्रतीक खरात, नेवासा तालुका युवक अध्यक्ष अमोल मोरे, संदीप सोनकांबळे, अमोल मोरे, युवक नेते प्रदीप भालेराव, पप्पू मोरे, संजय वाघमारे, बाळासाहेब शिरसाठ, प्रतीक गायकवाड आदींनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत