कोपरगाव/वेबटीम:- कोळपेवाडी पशुधन विकास अधिकारी पद एक महिन्यापासून रिक्त असल्याने जनावरा मध्ये लम्पी आजराणे थैमान घातले असून दोन जनावंरे ...
कोपरगाव/वेबटीम:-
कोळपेवाडी पशुधन विकास अधिकारी पद एक महिन्यापासून रिक्त असल्याने जनावरा मध्ये लम्पी आजराणे थैमान घातले असून दोन जनावंरे मृत्यू मुुखी पडल्या ने पशु पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे खाजगी डॉक्टर कडून उपचार करण्यासाठी किमाण चार ते पाच हजार रुपये मोजावे लागत असल्याने शेतकरी वर्गा सह पशु पालक हैराण झाले आहे.
कोळपेवाडी पशुधन विकास अधिकारी किरण खर्डे यांची १५ सप्टेंबर ला बदली होऊन ते राहुरी तालुक्यात रूजू झाले त्या अगोदर कोळपेवाडी त नवीन पशुधन विकास अधिकारी रुजू होणे गरजेचे असताना आज महिना उलटून देखील अधिकारी हजर न झाल्याने पशु धन उपचार सेवा राम भरोसे बनली आहे त्यात कोळपेवाडी पशुधन विकास कार्य क्षेत्रातील गावामध्ये लम्पि आजाराने थैमान घातले आहे देेशी बरोबर संकरीत गायीना आजाराची लक्षणे दिसून येत आहे अंगावर गाठी गाठी येेेवुन त्यातुन रक्त स्राव होतो यावेळी जनावर चारा पानी सोडून देत असल्याने वजन घटुन जनावर कमालीचे अशक्त बनते खाजगी डॉक्टर ची सेेवा घेण्यापलीकडेे पशुु पालकाना पर्याय उरला नाही हा आजार संसर्गजन्य असल्याने ऐकापासुन दुसऱ्या जनावरा मध्ये झपाट्याने फैलावत जातो या आजारावर लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते केवळ जनावरांच्या तापावर नियंत्रण ठेवण्यात औषध उपचार केले जातात नाशिक जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने खाजगी लस उपलब्ध करून पशुधना मधील आजार आटोक्यात ठेवल्याची चर्चा झडत आहे मात्र बाधित सरकारी आकडेवारी जाहीर नाही संसर्गजन्य आजारा मध्ये लाळ्याखरकुत फर्या घटसर्प आता थैमान घालीत असलेला लम्पि यावर वेळीच लसीकरण करणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे कर्तव्य असताना त्यांनी केलेली डोळे झाक पशुधन वार्यावर सोडण्याचा प्रकार ! साखर कारखाना हंगाम बीगुल वाजला असल्याने ऊस तोडणी कामगाराची बैल जनावरे मोठ्या प्रमाणात या परिसरात दाखल होतील त्यांना लसीकरण झाले आहे की नाही याची सरकारी आकडेवारी उपलब्ध नसल्याने आजाराचे थैमान झाल्यास त्यास जबाबदार कोन असेल असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे येत्या आठ दिवसात कोळपेवाडी पशूधन विकास अधिकारी पदी पुर्णवेळ अधिकारी न नेमल्यास श्री साई सेवा प्रतीष्ठाण संस्थे च्या वतीने जिल्हा परिषद पुढे आदोंलन करण्याचा ईशारा संस्थे चे अध्यक्ष रमेश भोगंळ यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत