कोपरगाव/प्रतिनिधी:- शहरातील प्रभाग पाचमध्ये कोविड आणि साथरोग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वराज्य प्रतिष्ठानकडून रविवारी (ता.१७) औषध फवारणी क...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
शहरातील प्रभाग पाचमध्ये कोविड आणि साथरोग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वराज्य प्रतिष्ठानकडून रविवारी (ता.१७) औषध फवारणी करण्यात आली.
आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपशहराध्यक्ष तथा स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदीप देवळालीकर यांनी कोविड व साथरोग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रविवारी औषध फवारणी करण्यात आली. प्रभाग पाचमधील महादेव मंदिर, सराफ बाजार येथून फवारणीला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, बाळासाहेब रुईकर, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, उपशहराध्यक्ष संदीप देवळालीकर, धनंजय कहार, गणेश लकारे, संदीप कपिले, मनोज नरोडे, जना शिंदे, महेश उदावंत, गोरख कानडे, शुभम भुजबळ, सोहम शिंदे, तुषार चिकने, अभिषेक उदावंत, संकेत मंडलिक, विपुल जगताप, ओम कपोते, समर्थ दीक्षित, बाळा देवकर, आशिष देवळालीकर, अजिंक्य सोनवणे यांसह स्वराज्य प्रतिष्ठानचे सदस्य, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल नागरिकांनी युवक राष्ट्रवादीचे उपशहराध्यक्ष तथा स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदीप देवळालीकर यांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत