शेती व्यवसायात महिलांचा मोलाचा वाटा - डॉ. कौशिक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शेती व्यवसायात महिलांचा मोलाचा वाटा - डॉ. कौशिक

शेवगाव(वेबटीम):- श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या वतीने शहापूर ता. नेवासा येथे “महिला किसान दिवस”...

शेवगाव(वेबटीम):-

श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या वतीने शहापूर ता. नेवासा येथे “महिला किसान दिवस” साजरा करण्यात आला. भारत देशाच्या स्वातंत्र्य सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने भारत सरकारने विविध महत्त्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून १५ ऑक्टोंबर हा दिवस  “महिला किसान दिवस” म्हणून संपूर्ण भारत देशात साजरा होत आहे. शेती व्यवसायात जेवढा वाटा पुरुषांचा आहे, तेवढाच समान वाटा महिलांचा देखील आहे. पिक लागवडीपासून ते काढणी आणि शेतमालाची विक्री होईपर्यंत महिला शेतात राबतात. म्हणून शेती व्यवसाय करत असताना निर्णय प्रक्रियेत महिलांना देखील तेवढाच हक्क आहे, जेवढा पुरुषांना आहे. असे प्रतिपादन केव्हीके दहिगाव-ने चे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कौशिक यांनी शहापूर येथील आयोजित महिला किसान दिवस कार्यक्रमात केले. 

शेतात कष्ट करत असताना महिलांचे कुठेतरी आहाराकडे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होते त्यामुळे आरोग्याचे प्रश्न उभे राहतात. याकरिता महिलांनी स्वत: साठी आणि कुटुंबासाठी पोषण परसबागेची जोपासना करावी असे आवाहन डॉ. कौशिक यांनी केले. शेती व्यवसायासोबतच महिलांनी शेती सलग्न जोडव्यवसाय करावेत, याकरिता बचत गटांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक गटांची स्थापना करावी असे मत केव्हीके चे शास्त्रज्ञ माणिक लाखे यांनी मांडले. या कार्यक्रमासाठी केव्हीके चे शास्त्रज्ञ राहुल पाटील आणि समाज विकास समितीचे अशोक गायकवाड उपस्थित होते.

 या कार्यक्रमासाठी शंभरहून अधिक महिला उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते उपस्थित महिलांना पोषक अल्पहार आणि प्रत्येकी एक ड्रॅगन फ्रूट फळ रोपांचे वितरण करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत