बेघर नागरीकांना हक्काची घरे, डीपीआर तयार करा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बेघर नागरीकांना हक्काची घरे, डीपीआर तयार करा

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील अनेक नागरिकांना हक्कांच्या घराचा लाभ मिळालेला नसून हे नागरिक आजही घरापसुन वंचित आहेत. अशा बेघर नागरिकांन...

कोपरगाव प्रतिनिधी:-


कोपरगाव शहरातील अनेक नागरिकांना हक्कांच्या घराचा लाभ मिळालेला नसून हे नागरिक आजही घरापसुन वंचित आहेत. अशा बेघर नागरिकांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने डीपीआर तयार करावा अशा आशयाच्या सूचनांचे निवेदन आ.आशुतोष काळे यांच्या वतीने कोपरगाव शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना दिले.



 शासनाचा वतीने बेघर नागरिकांना त्यांच्या हक्काची असावी यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. मात्र अशा योजनांपासून अनेक गरजू नागरिक वंचित राहत असून या नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी पुढाकार घेतला आहे. स्वत: जरी आजारी असले तरी आपल्या कर्तव्याची प्रामाणिकपणे अमलबजावणी ते करीत असून बेघर नागरिकांसाठी त्यांनी पाऊल उचलले आहे. त्याबाबत नुकतेच त्यांच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेला त्यांनी काही सूचना केल्या आहेत्र. यामध्ये जे नागरिक पात्र असून देखील हक्काच्या घरापासून वंचित आहेत अशा नागरिकांना तातडीने सर्व्हे करावा. बेघर असणाऱ्या कुटुंबांची नोंदणी करून आवास योजनेच्या नियमात या कुटुंबांना बसविण्यासाठी आय.एस.एस.आर., सी.एल.एस.आय., ए.एच.पी., बी.एल.सी. या सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करून बेघर असणाऱ्या कुटुंबांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी डीपीआर तयार करा.





 ज्या नागरिकांना जागेची अडचण आहे त्या नागरिकांसाठी कोपरगाव नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवर अॅफार्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट तयार करून  बेघर नागरिकांना हक्काचे घरकुल मिळावे यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी पाहणी करून डीपीआर तयार करावा. तसेच कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील ज्या ज्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देणे शक्य आहे त्या ठिकाणी बेघर असणाऱ्या कुटुंबाना घरे देण्यासाठी प्रस्ताव तयार करा. बेघर असणाऱ्या नागरिकांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करू असे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.  


         यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, सौ. प्रतिभा शिलेदार, सौ. वर्षा शिंगाडे, शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविदरसिंग डडीयाल, गौतम बँकेचे संचालक सुनिल शिलेदार, राजेंद्र वाघचौरे,कृष्णा आढाव,फकीर कुरेशी,विजय त्रिभुवन, रमेश गवळी आदि उपस्थित होते.


            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत