कोपरगाव/प्रतिनिधी:- शहरातील आदिनाथ सोसायटीला वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीने स्वतंत्र व्यवस्था केलेली नाहीये. यामुळे आपत्ती व इतर कार...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
शहरातील आदिनाथ सोसायटीला वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीने स्वतंत्र व्यवस्था केलेली नाहीये. यामुळे आपत्ती व इतर कारणांनी वीज पुरवठा विस्कळीत होऊन नुकसान होते. तसेच पालिकेने देखील पथदिवे लावलेले नाहीत. त्यामुळे महावितरण व पालिकेने याची दखल घेऊन समस्या सोडवाव्यात, अशी मागणी भूमिपुत्र फाउंडेशनचे निसार शेख यांनी केली आहे.
याबाबत महावितरणचे अधिकारी खंदारे व पालिका मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना नुकतेच निवेदन दिले आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते तथा भूमिपुत्र फाउंडेशनचे निसार शेख यांनी म्हंटले आहे की, आदिनाथ सोसायटीमध्ये कित्येक दिवसांपासून वीज पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाच नाहीये. तसेच पालिकेने पथदिवे देखील लावलेले नाहीत.
अनेकदा नैसर्गिक आपत्तीमध्ये वीज पुरवठा विस्कळीत होऊन नुकसान होते. त्यामुळे महावितरण कंपनीने तत्काळ व्यवस्था करावी व पालिकेने देखील पथदिवे बसवावे अशी मागणी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत