कोपरगाव(वेबटीम):- स्वच्छतेच्या विचारांना कृतीची जोड आणि पर्यावरण समतोलासाठी वृक्षारोपण सारखे विधायक उपक्रम माध्यमातून निरंतर सुरू राहणारी प्...
कोपरगाव(वेबटीम):-
स्वच्छतेच्या विचारांना कृतीची जोड आणि पर्यावरण समतोलासाठी वृक्षारोपण सारखे विधायक उपक्रम माध्यमातून निरंतर सुरू राहणारी प्रक्रीयासुरु राहण्यासाठी नवोदितांचा सहभाग महत्त्वाचा असून या अभियानाला कृतीची जोड देण्याचा संकल्प करण्याचे आवाहन सूर्यतेज संस्थापक व भारत सरकारचे स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केले आहे.
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दूसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांचे जयंती २ ऑक्टोबर रोजी सर्वत्र साजरी होत आहे.
सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी स्व.आर.आर.(आबा)पाटील यांचे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान,तसेच भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंती पासून सुरुकेलेले स्वच्छ भारत अभियानात श्री.साईबाबा संस्थान मार्फत प्रकाशित "स्वच्छ विचार ते स्वच्छ राष्ट्र" या भित्तीपत्रकातून मांडलेले विचारांची प्रधानमंत्री कार्यालयाने घेतली आहे.भारत सरकारने "स्वच्छतादूत" या उपाधीने सन्मानित करुन गौरविण्यात आले आहे.तसेच कचराकुंडी व काटेरी झुडपे हटवून तेथे वृक्षारोपण व सुशोभीकरण तसेच कचरा गाडीवर जनजागृती करिता ध्वनीक्षेप या दोन संकल्पना महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे.
टाकावू पासून टिकावू, शालेय स्वच्छता अभियान,सन २०१३ साली गोदावरी स्वच्छता अभियान, श्री रामनवमी उत्सव निमित्त कोपरगाव ते शिर्डी स्वच्छता अभियान,निर्माल्य संकलन अभियान,स्वच्छता जनाजागृती करिता वेगवेगळे शहरी व ग्रामीण कृतीशील उपक्रम राबविले आहे.शिर्डी उपविभागात "एक व्यक्ति एक झाड" या अंतर्गत सुमारे ५० हजारचे पुढे रोपांचे लोकसहभागातून मोफत वितरण,रोपण आणि पालकत्व दिले आहे.तसेच अनेक ठिकाणी लोकसहभागातून उद्यानांची निर्मिती केली आहे.शासनाचे स्वच्छ सर्व्हेक्षण समितीचे सदस्य म्हणून मराठवाडा(औरंगाबाद,जालना) काम पाहिले आहे.त्यांचे कार्याची दखल प्रसार भारतीने घेतली आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यात धार्मिक स्थळे व शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.या पार्श्वभूमीवर अनेक महिन्यांपासून बंद असलेली ही ठिकाणे सुरू होत आहे.या पार्श्वभूमीवर येथील स्वच्छता व सौंदर्य पुर्ववत ठेवणे महत्त्वाचे आहे. हे पुर्ववत करतांना केंद्र व राज्य सरकार मार्फत येणारी मार्गदर्शक तत्वे,लसीकरण,लक्षणे वाटल्यास कोरोना नियमित चाचणी,हात नियमित धुवून स्वच्छ ठेवणे, सामाजिक अंतर राखणे, लसीकरण झाले असेल तरी मास्क वापरणे महत्वाचे असल्याचे सांगितले.
अनेक वर्षांपासून शिर्डी उपविभागात व कोपरगाव तालुक्यात स्वच्छता आणि वृक्षारोपण कार्यात योगदान देवून सहभागी होणा-या नागरिकांचे आभार व्यक्त करत यापुढेही या निरंतर प्रक्रियेत नवोदितांनी संकल्प करुन सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दूसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांचे जयंती निमित्त सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत