सोनई परिसरातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सोनई परिसरातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका

सोनई(वेबटीम) सोनई पोलीस स्टेशन हद्दीतील गावां मध्ये  जातीय सलोखा अतिशय चांगल्या पध्दतीचा आहे.परंतु काही विघ्नसंतोषी लोक जाणीवपूर्वक राजकीय, ...

सोनई(वेबटीम)

सोनई पोलीस स्टेशन हद्दीतील गावां मध्ये  जातीय सलोखा अतिशय चांगल्या पध्दतीचा आहे.परंतु काही विघ्नसंतोषी लोक जाणीवपूर्वक राजकीय, जातीय तेढ निर्माण होईल अशा अफवा  समजा मध्ये पसरवल्या जातात जेणेकरून दोन समजा मध्ये .तेढ निर्माण झाले. पाहिजे हे प्रत्येक समाजासाठी अतिशय घातक आहे  आजची तरुण पिढी जातीय वादाकडे झुकलेली दिसत आहे. तरुण पिढीला आता सावरण्याची गरज आहे आपण चार बुक जास्त शिकलो म्हणजे फार मोठं काम केलं अस नाही. आपल्या पूर्वजांच्या विचार परंपरा माणुसकी अंगिकारली पाहिजे मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजून प्रत्येक माणसाची जाणीव ठेवली पाहिजे प्रत्येक सण तो कोणत्याही समाजाचा असो तो मोठ्या आनंदाने साजरा केला पाहिजे ती आपली संस्कृती आहे तसे आपल्यावर आपल्या पूर्वजांचे संस्कार आहेत .तो अमुक जातीचा तो तमुक जातीचा असे म्हणून भांडण करत बसू नका  आपण सर्व पृथ्वी वरचे काही काळा पुरते पाहुणे आहोत  गुण्यागोविंदाने रहावं एकमेकांचे सण उत्साह ने साजरे करावेत आयुष्य हे क्षणभंगुर आहे .पाण्याचा बुडबुडा आहे तो कधी जाईल याचा भरोसा नाही मी मी करत बसू नका जीवन आनंदात जगा.आपण समक्ष पहिल्या शिवाय कोणत्याही घटनेवर/ अफवांवर विश्वास ठेवू नये. 

काही अनुचित प्रकार घडत असेल किंवा  समजल्यास  आपल्या सोनई पोलिस ठाण्याशी संपर्क करावा.आपल्या गावची कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी आपल्या गावाचं गावपण टिकवाव ही  आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.आपण या जातीयवाला मुळा पासून नष्ट करू या 

आपले नम्र - *रामचंद्र कर्पे स.पो.नि मो-9881725100 सोनई पोलीस स्टेशन*,                   

    *बाबा वाघमोडे .                            (गोपनीय विभाग)सोनई पोलिस स्टेशन  सोनई ता.नेवासा जिल्हा .अहमदनगर. *02427-232533*                  *मो- 9527554300*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत