राहुरी(वेबटीम):- राहुरी तालुक्यातील सोनगाव, धानोरे व पंचक्रोशीत शुक्रवारी आरपीआय आंबेडकर गटाच्या शाखा उद्घाटन सोहळा संपन्न शुकवार दि 22 ऑक...
राहुरी(वेबटीम):-
राहुरी तालुक्यातील सोनगाव, धानोरे व पंचक्रोशीत शुक्रवारी आरपीआय आंबेडकर गटाच्या शाखा उद्घाटन सोहळा संपन्न शुकवार दि 22 ऑक्टोबर रोजी रात्री राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर सिनेअभिनेत्री मोनिका बंगाळ उपस्थित होत्या.
सिनेअभिनेत्री मोनिका बंगाळ यांच्या चाहत्यांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. आपल्या मनोगतातून सिनेअभिनेत्री मोनिका बंगाळ यांनी दीपक भाऊ निकाळजे यांच्या कार्याच कौतुक केलं.
यावेळी आरपीआय महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, महेश सुराडकर, जिल्हा सचिव राजन ब्राह्मणे, जिल्हाध्यक्ष राकेश कापसे आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत