राहुरी फॅक्टरी येथे रविवारी मातोश्री हॉस्पिटलचा शुभारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथे रविवारी मातोश्री हॉस्पिटलचा शुभारंभ

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- येथील श्रीरामपूर रोड येथील श्री.दत्त कॉम्प्लेक्स येथे मातोश्री हॉस्पिटल व युनिटी मेडिकेअरचा शुभारंभ रविवार दिनांक ...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

येथील श्रीरामपूर रोड येथील श्री.दत्त कॉम्प्लेक्स येथे मातोश्री हॉस्पिटल व युनिटी मेडिकेअरचा शुभारंभ रविवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे.

राहुरी फॅक्टरी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रुग्ण सेवा करत असलेले डॉ.रवी घुगरकर व डॉ.रेणुका घुगरकर यांनी सर्वंसोयीनी युक्त अद्यावत असे मातोश्री हॉस्पिटलची उभारणी केली असून या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनयुक्त बेड्सही सुविधा दिली जाणार आहे. राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा व परिसरातील गावांतील रुग्णांना योग्य व माफक दरात उपचार तसेच २४ तास सेवा देण्याचा संकल्प डॉ.घुगरकर दांपत्यानी केला आहे.


 या हॉस्पिटलचे तसेच युनिटी मेडिकेअरचे उद्घाटन राहुरी येथील डॉ.विक्रम खुरुद,  साकरवाडी येथील गोदावरी बायोरेफीनरीजचे संचालक सुहास गोडगे, पोलीस हेडकॉन्स्टेबल  राजेंद्र गोडगे, पुणे येथील विधिज्ञ अमोलजी डांगे आदींच्या उपस्थित रविवार दि.२४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे.

 तरी परिसरातील नागरीकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन शिवाजी घुगरकर सर, सौ.सुजाता घुगरकर, तुकाराम घुगरकर, गजानन घुगरकर, डॉ.रवी घुगरकर, डॉ.रेणुका घुगरकर, युनिटी मेडिकेअरचे कृष्णा डोंगरे आदींने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत