राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर नाका येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने वाढत्या इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर नाका येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने वाढत्या इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल ,डिझेल, एलपीजी गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्व सामान्य नागरिक हैराण झाले असून या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने राहुरी फॅक्टरी येथे बैलगाडी मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात माजी नगरसेवक आप्पासाहेब कोहकडे, ललित चोरडिया, सुनील विश्वासराव , किशोर थोरात, श्रीरामपूर जिल्हा विकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजेंद्र लांडगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस राहुरी फॅक्टरीचे शहराध्यक्ष विक्रांत पंडित, देवळाली प्रवरा शहराध्यक्ष दीपक कदम, प्रतीक जाधव, कांतीलाल उल्हारे, आशुतोष सांगळे, सागर उल्हारे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत