कोपरगाव/प्रतिनिधी:- शहरात कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार 'एक गाव, एक गणपती' साजरा केला. त्यानुसारच आता शारद...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
शहरात कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार 'एक गाव, एक गणपती' साजरा केला. त्यानुसारच आता शारदीय नवरात्रौत्सव सार्वजनिकरित्या साजरा करू नये, असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.
सलग दोन वर्षे कोपरगाव शहरातील नागरिक, गणेश भक्त, सार्वजनिक गणेश मंडळे व सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 'एक गाव, एक गणपती' हा उपक्रम प्रशासनाच्या सहकार्याने यशस्वी करून दाखविला. महाराष्ट्रात तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी फक्त कोपरगावमधेच हा उपक्रम राबवून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा प्रयत्न केला.
आताही कोपरगाव नगरपरिषद व आरोग्य विभाग, महसूल विभाग व नागरिकांच्या सहकार्याने लसीकरण मोहिमही मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे सुरू आहे. जरी शासनाने ७ ऑक्टोबरपासून मंदिरे खुली करण्याची परवानगी दिली असली तरीही आपण कुठेही सार्वजनिक ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा करू नये. गर्दी जमा झाल्यावर कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा मोठाच धोका आहे. दुर्दैवाने कोरोना प्रादुर्भाव वाढण्यातअहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. दोन वर्षात कोपरगावात कोरोनामुळे झालेली प्राणहानी सर्वांनीच अनुभवलेली आहे. पुन्हा अशी दुरवस्था होऊ नये यासाठी आपण सर्वांनीच शासनाने घालून दिलेले कोरोनाचे सर्व नियम, कायदे काटेकोरपणे पाळून सर्वांचेच जीवन सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न करावे असे आवाहन नगराध्यक्ष वहाडणे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत