देवळाली/वेबटीम:- देवळाली प्रवरा येथील समाजसेवक चंद्रकांत दोंदे यांची राष्ट्रवादी सोशल मीडिया च्या अहमदनगर जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती कर...
देवळाली/वेबटीम:-
देवळाली प्रवरा येथील समाजसेवक चंद्रकांत दोंदे यांची राष्ट्रवादी सोशल मीडिया च्या अहमदनगर जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली .राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष तथा शिर्डी साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त तथा महावितरणचे माजी सदस्य अजित पाटील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली प्रवरा येथील चंद्रकांत दोंदे यांची राष्ट्रवादी सोशल मीडिया च्या अहमदनगर जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी सोशल मीडियाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अहमदनगर जिल्हासरचिटणीस जगदिश ढुस, राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष अनिल कासार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राहुरी शहराध्यक्ष ओंकार कासार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे देवळाली प्रवरा शहराध्यक्ष ऋषी संसारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दोंदे यांच्या नियुक्तीचे सर्व मित्र परिवार यांचे वतीने स्वागत होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत