कोपरगाव मोबाईल यूनियनची बैठक उत्साहात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव मोबाईल यूनियनची बैठक उत्साहात

  कोपरगाव/प्रतिनिधी:- कोपरगाव मोबाईल यूनियनच्या बैठकीचे रविवारी (ता.१०) आयोजन करण्यात आले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी विविध वि...

 कोपरगाव/प्रतिनिधी:-


कोपरगाव मोबाईल यूनियनच्या बैठकीचे रविवारी (ता.१०) आयोजन करण्यात आले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली.

यूनियनचे अध्यक्ष निसार शेख, उपाध्यक्ष सादिक पठाण, सचिव दिनेश शिंदे, स्वप्नील आहेर, खजिनदार मोबिन अत्तार, तुषार पारखे आदी पदाधिकारी, सदस्य व दुकानदार कोरोना नियम पाळून उपस्थित होते. या बैठकीत दुकानदारांच्या समस्या समजून घेऊन सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे ठरले. याचबरोबर सर्व दुकानदारांच्यावतीने यूनियनची नियमावली तयार करण्याचे ठरले. तसेच कोणीही घाऊक व किरकोळ असा प्रकार करणार नसल्याचे ठरविले आणि लवकरच ऍक्सेसरीज, रिपेअरिंग, आणि वस्तूंचे दर निश्चित केले जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शेवटी यूनियनचे अध्यक्ष निसार शेख व पदाधिकाऱ्यांनी कोपरगाव शहरातील सर्व दुकानदारांना यूनियनमध्ये समाविष्ट होण्याचे आवाहन करून महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टने बैठकीस जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवक मंदार पहाडे व सर्व ट्रस्टचे आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत