कोपरगावमधील प्रभाग पाचमध्ये लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावमधील प्रभाग पाचमध्ये लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद

कोपरगाव/प्रतिनिधी:- युवा नेते शुभम गायकवाड व अंबिका तरुण मित्रमंडळाने रविवारी (ता.१०) आयोजित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणास शहरातील प्रभ...

कोपरगाव/प्रतिनिधी:-


युवा नेते शुभम गायकवाड व अंबिका तरुण मित्रमंडळाने रविवारी (ता.१०) आयोजित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणास शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.


कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लसीकरणावर जास्त भर दिलेला आहे. त्यानुसार जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने युवा नेते शुभम गायकवाड व अंबिका तरुण मित्रमंडळाने शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील अंबिका चौकातील देवी मंदिरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे आयोजन केले होते. यास प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ३५० लसींचा पहिला व दुसरा डोस घेतला. याकामी डॉ.गायत्री आहेर, आशासेविका स्वाती बनसोडे, योगिता गऊल, छाया सुपेकर, संगीता पाईक, राजेंद्र इंगळे, प्रशांत उपाध्ये, महारुद्र गालट आदिंनी परिश्रम घेतले. यावेळी विनायक गायकवाड, शुभम गायकवाड, वाल्मिक गोसावी, राहुल गायकवाड, तन्मय गायकवाड, नंदन वाघमारे, गोपीनाथ गायकवाड, राहुल गायकवाड, सागर थोरात, अभिजीत भुजबळ, विकी जोशी, निखील तांबे, ज्ञानेश्‍वर आदमाने, ऋषीकेश गोसावी, फरदीन बेग, विनायक रत्नपारखी, सौरभ गायकवाड, आकाश हलपाई, तुषार जोशी, प्रसाद पांडे, सार्थक गायकवाड, अभिषेक गायकवाड, सुभाष गोसावी, गौरव कोधळकर, दर्शन धाडीवाल, नीलेश वाघमारे आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत