कोपरगाव/वेबटीम:- जाणता राजा प्रतिष्ठान,भानसहिवरा ता.नेवासा वतीने मातोश्री स्व.सौ.द्वारकाबाई मारुतराव मोहिटे पाटील स्मरणार्थ अहमदनगर जिल्हा प...
कोपरगाव/वेबटीम:-
जाणता राजा प्रतिष्ठान,भानसहिवरा ता.नेवासा वतीने मातोश्री स्व.सौ.द्वारकाबाई मारुतराव मोहिटे पाटील स्मरणार्थ अहमदनगर जिल्हा परिषदेचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी,योग शिक्षक,मनशक्तीचे श्री.संतोषजी नलगे साहेब यांना "समाजरत्न" पुरस्कार जाहीर झाला असल्याची घोषणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव मोहिटे पाटील यांनी केली आहे.
जाणता राजा प्रतिष्ठानने अहमदनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय व दिशादर्शक कामगिरी करणाऱ्या १५ व्यक्तींची प्रोत्साहन म्हणून निवड करण्यात आली आहे.
मनमिळावू स्वभावाचे श्री.संतोषजी नलगे साहेब यांचे वडील कै.दत्तात्रेयजी नलगे यांनी भेंडा,तरवडी,भानसहिवरे या गावांसह इतरही गांवात ग्रामसेवक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.श्री.संतोषजी हे हाॅलीबाॅलचे पुणे विद्यापीठ खेळाडू राहिले आहे.योगासनात ते पंडित परिक्षा प्राविण्य असून मनशक्ती केंद्राचे साधक आहे.तसेच अहमदनगर जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी सोसायटीचे संचालक आहेत.अनेक प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी, सर्वसामान्य नागरिकांना योगासनाचे मोफत प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सेवा निरंतर सुरू आहे.
प्रशासकीय सेवा आणि सामाजिक भान ठेवून आदर्श व्यक्तिमत्व श्री.संतोषजी नलगे साहेब यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत