ब्राम्हणी/वेबटीम:- गावची लोकसंख्या विचारत घेता एवढ्या मोठ्या गावाला अत्याधुनिक रेडिमेड स्टीलच्या तिरडीची गरज आहे.ही बाब लक्षात घेत स्व. इंद...
ब्राम्हणी/वेबटीम:-
गावची लोकसंख्या विचारत घेता एवढ्या मोठ्या गावाला अत्याधुनिक रेडिमेड स्टीलच्या तिरडीची गरज आहे.ही बाब लक्षात घेत स्व. इंद्रायणी काशिनाथ हापसे यांच्या स्मरणार्थ हापसे परिवाराने दशक्रिया विधीनिमित्त ग्रामपंचायतकडे तिरडी सुपूर्त केली. तिरडी लोकार्पण होताच त्याचा उपयोग गावासाठी सुरू झाला आहे.
याशिवाय दशक्रिया विधीच्या पूर्वसंध्येलाच स्मशानभूमी व दशक्रिया विधी कार्यक्रम स्थळ परिसराची स्वच्छता करून इंद्रायणी हापसे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले.तिरडी लोकार्पण प्रसंगी राहुरी तालुका वारकरी संप्रदायाचे तालुकाध्यक्ष बाळकृष्ण बानकर, झेडपीचे माजी सदस्य विक्रम तांबे, डॉ. तनपुरे सहकारी कारखान्याचे संचालक भारत तारडे,गोकुळदास आढाव, उंबरे गावचे माजी उपसरपंच पत्रकार दत्तात्रय तरवडे, संभूगिरी गोसावी महाराज, अण्णा महाराज राजदेव,
प्रभाकर हापसे, भाऊसाहेब खोसे,मोहन कुंभकर्ण, गोरक्षनाथ हापसे, आप्पासाहेब हापसे,गोपीनाथ हापसे, बापूसाहेब हापसे, संजय हापसे, राजेंद्र हापसे, सतिष हापसे, गणेश हापसे, महेंद्र हापसे,सुरेश कोतकर आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत