संगीता गायकवाड -भांड यांना राज्यस्तरीय कर्तुत्ववान शिक्षक या पुरस्काराने गौरवल्याबद्दल खा.विखेंच्या हस्ते सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संगीता गायकवाड -भांड यांना राज्यस्तरीय कर्तुत्ववान शिक्षक या पुरस्काराने गौरवल्याबद्दल खा.विखेंच्या हस्ते सन्मान

  देवळाली प्रवरा/राजेंद्र उंडे:- शिक्षण धेय या सामाजिक संस्था नंदुरबार यांच्या वतीने राहुरी फँक्टरी येथिल शिवाजी शिक्षण मंडळाच्या  छत्रपती श...

 देवळाली प्रवरा/राजेंद्र उंडे:-

शिक्षण धेय या सामाजिक संस्था नंदुरबार यांच्या वतीने राहुरी फँक्टरी येथिल शिवाजी शिक्षण मंडळाच्या  छत्रपती शिवाजी   हायस्कूलच्या प्राध्यापिका  संगीता गायकवाड -भांड  यांना राज्यस्तरीय कर्तुत्ववान शिक्षक या पुरस्काराने मिळाल्याबद्दल डाँ.तनपुरे कारखान्याचे सर्वेसर्वा खासदार डॉ. सुजय  विखे पाटील यांच्या शुभहस्ते नुकताच सन्मान करण्यात आला.

  राहुरी फॅक्टरी डाँ.तनपुरे कारखान्याच्या सलग्न असलेल्या शिवाजी शिक्षण मंडळातील प्रा. संगीता गायकवाड भांड मॅडम यांना नुकताच राज्यस्तरीय कर्तुत्ववान शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते सत्त्कार  करण्यात आला.

             माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले , राहुरी कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे राहुरी तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष  अमोल भनगडे पंचायत समितीचे सदस्य सुरेश बानकर राहुरी कारखान्याचे संचालक शामराव निमसे केशवराव कोळसे रवींद्र म्हसे यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

 यावेळी खासदार डाँ. सुजय  विखे पाटील यांनी सांगितले की, चांगले काम केल्यास समाज  त्याची दखल घेतो.त्याचे उदाहरण आपल्या संस्थेच्या शिक्षिका  गायकवाड या आहेत.त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळेच त्यांना राज्यस्तरीय कर्तुत्ववान शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.त्यांचा इतर शिक्षकांनी आदर्श इतरांनी घ्यावा. 

  यावेळी सत्कारमूर्ती प्रा. संगीता गायकवाड - भांड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले  काम करण्यासाठी मोठी संधी आहे.ती संधी आपण शोधली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या हिताचे शिक्षण साध्या सोप्या भाषेत विकसित केले पाहिजे. शिक्षकाच्या चांगल्या व दर्जेदार शिक्षणामुळे आजचा विद्यार्थी उद्याचा  उत्तम नागरिक बनणार आहे. शिक्षण क्षेञाशी मिळालेला हा पुरस्कार मी माझ्या विद्यार्थ्यां प्रती समर्पित करते असे प्रा.गायकवाड यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत