सात्रळ वेबटीम: : येथील अभिरुची सार्वजनिक वाचनालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण...
सात्रळ वेबटीम:
:येथील अभिरुची सार्वजनिक वाचनालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या वेळी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष सुभाष शेजवळयांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्यांनी वाचनाचे महत्व, त्या मिळणारे ज्ञान, माहिती या बद्दलचे फायदे, डॉ. कलाम यांच्या जीवन चरित्राची माहिती नमूद केली.
वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यासाठी अभिरुची वाचनालयात जेष्ठ अभ्यासक सुखदेवराव ताठे, पत्रकार सुनील सात्रळकर, सुभाष गागरे,बाबासाहेब प्रधान, योगेश प्रधान, प्रतीक चोरमुंगे, सुरेश काकडे, रवींद्र शेजवळ, बबनराव राऊत, निवृत्ती जोर्वेकर तसेच ग्रामस्थ हजर होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत