सोनगाव/वेबटीम:- ग्रामपंचायत सोनगावच्या 14 व्या /15 व्या वित्त आयोगांर्तगत सौर स्ट्रीट लाईटचे उद्घाटन. ग्रामपंचायत चा दरमहाचा लाईट बिलाचा खर्...
सोनगाव/वेबटीम:-
ग्रामपंचायत सोनगावच्या 14 व्या /15 व्या वित्त आयोगांर्तगत सौर स्ट्रीट लाईटचे उद्घाटन. ग्रामपंचायत चा दरमहाचा लाईट बिलाचा खर्च कमी व्हावा.तसेच लाईट नसताना ही सुरक्षेच्या दृष्टीने राञी बाजारपेठेत लख्ख प्रकाश असावा.या हेतुने उपसरपंच किरण पा अंञे यांनी सुचवलेल्या सोनगाव येथील बाजारपेठेत सौर स्ट्रीट लाईट बसवण्याचे काम सुरू करण्यात आले सदर कामाचे उद्घाटन सोमवार दि.11/10/21 रोजी सोनगाव सोसायटीचे चेअरमन राजुभाऊ अनाप व सरपंच अनिल अनाप यांच्या उपस्थितीत मुळा प्रवराचे संचालक मच्छिंद्र पा अंत्रे व सोनगाव सोसायटीचे संचालक रोहिदास उर्फ बंटीभाऊ कानडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी भाजपाचे उपाध्यक्ष नारायण धनवट,भाजपा अल्पसंख्यांक उपाध्यक्ष मोहम्मद तांबोळी,सदस्य एजाज तांबोळी,शरद अंञे,राहुल अंञे,विजय अनाप, शामराव जाधव,शामराव अंत्रे, विश्वनाथ कडनोर ,मुकुंद गोडबोले, आदीसह, ग्रामस्थ व पदाधिकारी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत