नागरिकांनी दिवाळी सणाच्या धामधुमीत करोनाचा विसर पडू देऊ नये - अँड.नितीन पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नागरिकांनी दिवाळी सणाच्या धामधुमीत करोनाचा विसर पडू देऊ नये - अँड.नितीन पोळ

कोपरगाव(वेबटीम):- काही प्रमाणात करोना रुग्ण संख्या कमी झाली असली तरी दिवाळीच्या धामधुमीत नागरिकांनी करोना चा विसर पडू देऊ नये व करोना रुग्ण ...

कोपरगाव(वेबटीम):-


काही प्रमाणात करोना रुग्ण संख्या कमी झाली असली तरी दिवाळीच्या धामधुमीत नागरिकांनी करोना चा विसर पडू देऊ नये व करोना रुग्ण संख्या रोखण्यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी केले आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी देशात करोना महामारीने उच्छाद मांडला होता त्यामुळे संपूर्ण देश लॉक डाऊन करण्याची परिस्थिती उदभवली होती पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले जीव गमवावे लागले होते. 

देशात सद्या बऱ्या पैकी लसीकरण झाले त्याच प्रमाणे रुग्ण संख्या बऱ्या पैकी कमी झाली त्यामुळे अनेक ठिकाणी असलेले निर्बंध कमी करण्यात येऊन शाळा कॉलेज व सर्व व्यवहार सुरळीत झाले दोन वर्षांपासून बंद असलेले सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले असताना जगातील अनेक देशात करोना साथीच्या आजाराने पुन्हा एकदा मुसंडी घेतली आहे.

आपल्या कडेही लसीकरण झाले व व्यवहार सुरळीत झाले असल्याने  करोना साथीचा आजार रोखण्यासाठी पहिल्या सारखी कोणीच काळजी घेताना दिसत नाहीत.

सद्या दिवाळीचा सण देशभर साजरा होत असताना बाजार पेठ पुन्हा गर्दीने फुलून गेली आहे अशात आपल्या कडे देखील रुग्ण संख्या वाढत आहे त्यामुळे शासनाने निर्बंध उठवले असले तरी नागरिकांनी पुन्हा काळजी घेण्याची आवश्यकता आहे केवळ निर्बंध उठवले म्हणून कोणताही अनिर्बंध संचार करण्या ऐवजी या सणासुदीच्या काळात करोना साथीच्या आजाराचा उद्रेक होणार नाही म्हणून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आव्हाहन अँड.पोळ यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत