श्रीरामपूर(वेबटीम):- छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले गडकिल्ले महाराजांच्या संघर्षाची आणि पराक्रमाची प्रतीके आहेत. आपल्या संस्कृत...
श्रीरामपूर(वेबटीम):-
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले गडकिल्ले महाराजांच्या संघर्षाची आणि पराक्रमाची प्रतीके आहेत. आपल्या संस्कृतीत गडकोटांना प्राचीन स्थान आणिअनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातील बरेचशे गडकोट हे कालांतराने नामशेष होत चालले आहेत. त्यातच हा इतिहास नवीन पिढी हळूहळू विसरत चालली आहे. आताचे गडकोट आपण फक्त आता त्याकाळी असे असावेत याची फक्त कल्पनाच करू शकतो. त्या कल्पना मनात ठेऊनच आणि गडकोटांच्या स्मृती जपाव्यात यासाठीच किल्ले बनवण्याच्या परंपरेचा उदय झाला असावा.दिवाळीच्या सुट्टीत ही किल्ले बांधणीची प्रथा आपणच नवीन पिढीला प्रोत्साहित करावयास पाहिजे. या परंपरेतूनच त्यांचे गडकोटांविषयी प्रेम आणि दुर्गभ्रमंतीची आवड जडेल. याच कल्पनेतून श्रीरामपूर येथील सह्याद्री ट्रेकर्स यांनी किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा निशुल्क असून या स्पर्धेत १६ वर्षे वयोगटातील मुले सहभागी होऊ शकतात. किल्ला आपापल्या घरी तयार करून दि. ०८ नोव्हेंबरच्या आत खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर फोटो आणि आपले नाव, पत्ता पाठवायचा आहे. विजेत्या तीन स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे दिले जातील. तसेच सहभागी स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाईल.
किल्ल्यांचे परीक्षण परीक्षक स्वतः घरी येऊन करतील. फोटो आणि नाव नोंदणी साठी सचिन भांड 9595966990, उमेश शिंदे 9764768300, सचिन चंदन 9404016443, डॉ. रवींद्र महाडिक 9860464275 या नंबरवर संपर्क करून जास्तीत जास्त मुलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन सह्याद्री ट्रेकर्स श्रीरामपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत