आमदार आशुतोष काळे यांच्या भगीरथ प्रयत्नांना मोठे यश - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आमदार आशुतोष काळे यांच्या भगीरथ प्रयत्नांना मोठे यश

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातून जात असलेला व नव्याने घोषित झालेला सावळीविहीर ते सेंधवा (म.प्र.) या मार्गाला एन.एच.७५२ जी हा क्रमांक ...

कोपरगाव प्रतिनिधी:-


कोपरगाव तालुक्यातून जात असलेला व नव्याने घोषित झालेला सावळीविहीर ते सेंधवा (म.प्र.) या मार्गाला एन.एच.७५२ जी हा क्रमांक देण्यात आलेला असून या मार्गाचे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण झाले नसल्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद झालेली नव्हती. त्यासाठी या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे तातडीने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करावे याबाबत आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या भगीरथ प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून नगरमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी एन.एच.७५२ जी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्याचे जाहीर केले असून त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जनतेच्या वतीने ना. नितीन गडकरी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे आभार मानले आहे. या विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ, राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते मात्र आ. आशुतोष काळे कोरोनावर उपचार घेत असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाही.



सिन्नर, शिर्डी, अहमदनगर, दौंड, बारामती, पैठण ते कर्नाटक राज्यातील शिकोडी पर्यंत (राष्ट्रीय महामार्ग) एन.एच.१६० मंजूर करण्यात आला असून राहाता तालुक्यातील सावळीविहीर फाटा ते सेंधवा (म.प्र.) पर्यंत या रस्त्यासाठी (राष्ट्रीय महामार्ग) एन.एच.७५२ जी असा क्रमांक देण्यात आलेला आहे. (राष्ट्रीय महामार्ग) एन.एच.१६० साठी निधीची तरतूद करण्यात आलेली असून या रस्त्याच्या कामाचे टेंडर देखील देण्यात आलेले आहे. मात्र (राष्ट्रीय महामार्ग) एन.एच.७५२ चे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे  हस्तांतरण झालेला नसल्यामुळे या मार्गासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी हा राष्ट्रीय महामार्ग एन.एच.ए. आय.कडे हस्तांतरीत करण्यासाठी आपण जातीने लक्ष घालावे असे साकडे राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांना घातले होते व त्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी यांची देखील दिल्ली येथे भेट घेवून त्यांना हा महामार्ग एन.एच.ए. आय.कडे हस्तांतरीत करण्यासाठी विनंती केली होती. या पाठपुराव्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोपरगाव-सावळीविहीर महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मिळवून देण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी मोठा पाठपुरावा केलेला आहे. या पाठपुराव्याला आज अपेक्षित यश मिळाले आहे. ना. गडकरी यांनी एन.एच.७५२ जी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्याचे जाहीर केल्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने त्याचा मोठा फायदा होणार आहे.




कोपरगाव विधानसभा मतदार संघातील दळणवळणाच्या दृष्टींने अत्यंत महत्वाचा दक्षिण-उत्तर असलेला सावळीविहीर ते सेंधवा या मार्गाची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. या मार्गावरून नियमितपणे एक लाख मेट्रिक टन वजनाच्या जवळपास दहा हजार वाहनांची दैनिक वर्दळ असते. कोपरगाव तालुक्याच्या शेजारीच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिर्डी देवस्थान असल्यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या राज्यातील व परराज्यातील साईभक्तांना या खराब रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने घटस्थापनेपासून सर्व मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला असून शिर्डीचे मंदिर देखील साईभक्तांसाठी खुले होणार आहे. हा महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण होणार असल्यामुळे या महामार्गासाठी लवकरच निधीची तरतूद होवून काम सुरु होईल व साईभक्तांना देखील होणारा त्रास कमी होणार आहे. त्यामुळे आ. आशुतोष काळे कोरोनावर उपचार घेत असल्यामुळे जरी कार्यक्रमाला हजर राहू शकले नसले तरी त्यांनी ना. गडकरी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे जाहीर आभार मानले आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत