राष्ट्रपिता महात्मा गांधी हे जगाचे शांतिदूत – परशराम साबळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राष्ट्रपिता महात्मा गांधी हे जगाचे शांतिदूत – परशराम साबळे

कोपरगांव शहर प्रतिनिधी- सत्य अहिंसा व त्यागाची शिकवण देणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शिकवणीनुसार  भारतच नव्हे तर संपूर्ण जग...

कोपरगांव शहर प्रतिनिधी-

सत्य अहिंसा व त्यागाची शिकवण देणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शिकवणीनुसार  भारतच नव्हे तर संपूर्ण जग चालत असून त्याच मुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे  संपूर्ण जगाचे एक आदर्शवत शांतीदूत ठरले असल्याचे प्रतिपादन मानव कौशल्य विकास असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख व ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांनी व्यक्त केले.



राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५२ वी जयंती असून संपूर्ण जगभरात मोठ्या जल्लोषात गांधीजीची जयंती साजरी करण्यात येते.कोपरगाव येथे देखील ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेत संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात गांधीजींना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी  संस्थेच्या सचिव सुचित्रा साबळे,अहमदनगर जिल्हा प्रमुख आशिष देवळलीकर, नाशिक विभाग प्रमुख महेंद्र झपाटे, सुपरवायझर विलास चव्हाण, निलेश देवकर, निमा गावित, वंती गावित, शुभांगी गावित आदी मानव कौशल्य विकास चे पदाधिकारी उपस्थित होते.



प्रसंगी साबळे यांनी पुढे बोलतांना सांगितले की,जगाच्या इतिहासात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मोठे स्थान असून गांधींजींसह अनेक स्वातंत्र्य सैनिक व राष्ट्रपुरुष यांनी केलेल्या त्यागातून भारताला इंग्रजांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळाले आहे. देशात शांतता व एकोपा नांदण्यासाठी महात्मा गांधींनी दिलेले सत्य अहिंसेचे तत्त्व हे भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला प्रेरणादायी ठरले आहे. 

 महात्मा गांधी हे संपुर्ण जगाचे शांतिदूत असून गांधीजींच्या शिकवणीचा व  विचारांचा आजच्या सर्व तरुण पिढीने अनुकरण करावे असे आवाहनही यावेळी साबळे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत