सात्रळ/वेबटीम:- सात्रळ ग्रामपंचायत कडून दलित सुधार योजना साठी येणाऱ्या निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोप दत्तू पडघलमल व इतर दलित युवकांन...
सात्रळ/वेबटीम:-
सात्रळ ग्रामपंचायत कडून दलित सुधार योजना साठी येणाऱ्या निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोप दत्तू पडघलमल व इतर दलित युवकांनी केला असून या बाबतची निवेदन सात्रळ चे सरपंच सतिष ताठे व ग्रामविकास अधिकारी हैदरभाई पटेल यांना ग्रामपंचायत सदस्यांचा उपस्तिथ देण्यात आले.
निवेदनात माळेवाडी ते कापूरआई फाटा येते बसविण्यात आलेले पथ दिवे दलित सुधार निधीतून बसविले असून या भागात दलित कुटुंब संख्या फक्त पाच दाखवून त्यांच्या नावाखाली इतर फायदा घेत असून गाव हद्दीतील इतर दलित वस्त्यांमध्ये कुटुंब संख्या जास्त असतानाही त्यानं या सुधार निधी पासून वंचित राहत असल्याचे निवेदनत उल्लेख केलेला आहे. सात्रळ ग्रामपंचायत प्रशासन मनमानी कारभारामुळे ज्या ठिकाणी दलित समाजाला योजना राबविणे अपेक्षित होते त्या ठिकाणी ने राबविता दलित समाजाला योजनेच्या लाभापासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचे काम होताना आदळत आहे. तसेच दलित सुधार योजनेचा आलेला निधी चा वापर कोठे, किती व कशासाठी केला याची सविस्तर माहिती ग्रामस्थना देण्याची मागणी या करण्यात आली.
ग्रामपंचायत ची आज चालू असलेल्या मासिक मिटिंग मध्ये हे निवेदन दिल्यानंतर दलित युवकांना सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्यामुळे मिटिंग मध्ये गोंधळ उडाला होता.
या निवेदन वर सुमारे साठ ते सत्तर युवकांच्या सह्या असून या प्रसंगी दत्तात्रय पडघलमल,साळू पडघलमल, पंकज राजेंद्र पडघलमल, संदीप बाळासाहेब पडघलमल, राजू भाऊसाहेब पडघलमल, विशाल लोंढे, अक्षय जोरेम पडघल मल, तसेच युवक मोठया संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत