कोपरगाव/प्रतिनिधी:- शहरातील कर्मवीर नगर, आदिनाथ सोसायटी, दुल्हनबाई वस्ती, गोकुळ नगरी, सह्याद्री कॉलनी, द्वारका नगरी, शंकर, नगर, ओम नगर या नव...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
शहरातील कर्मवीर नगर, आदिनाथ सोसायटी, दुल्हनबाई वस्ती, गोकुळ नगरी, सह्याद्री कॉलनी, द्वारका नगरी, शंकर, नगर, ओम नगर या नव्याने पालिका हद्दीत सहभागी झालेल्या भागांत बुधवारपासून (ता.२०) पथदिव्यांचे खांब गाडण्याचे काम सुरू झाले . याकामी पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांचे शहरवासियांनी आभार मानले आहे.
सद्यस्थितीत वरील भागांचा नव्याने पालिका हद्दीत सहभाग झालेला आहे. या भागात पथदिवे,८ इंची पिण्याची पाईपलाईन, रस्ते, काही ठिकाणी विजेचे खांब अजूनही उभे केलेले नाही. याकामी सामाजिक कार्यकर्ते निसार शेख अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत होते. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून हद्दवाढ झालेल्या भागातील अनेक कामे मंजूर होऊन मार्गी लागलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारपासून कर्मवीर नगर येथील पथदिव्यांचे पोल गाडण्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांचे आभार मानले आहे. तर सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांनी कोपरगाव नगरपरिषद, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत