कर्मवीरनगरमध्ये पथदिव्यांच्या कामाचा शुभारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कर्मवीरनगरमध्ये पथदिव्यांच्या कामाचा शुभारंभ

कोपरगाव/प्रतिनिधी:- आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पालिकेकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आल...

कोपरगाव/प्रतिनिधी:-


आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पालिकेकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, कर्मवीरनगरसह इतर परिसरांत बुधवारी (ता.20) पथदिव्यांच्या कामास शुभारंभ झाला आहे. 

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, कार्याध्यक्ष संदीप कपिले, शहर उपाध्यक्ष भावेश थोरात, स्थानिक नागरिक श्री.वाकचौरे, श्री.शिंदे, गिरीधर पवार आदी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून कर्मवीरनगर, आदिनाथ सोसायटी, दुल्हनबाई वस्ती, गोकुळ नगरी, सह्याद्री कॉलनी, द्वारका नगरी, शंकर नगर, ओम नगर या हद्दवाढ झालेल्या भागात पथदिवे, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, रस्ते प्रश्न प्रलंबित आहेत. याकामी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पालिकेला निवेदन देवून वरील प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्यास यश आले असून, बुधवारपासून पथदिव्यांच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. याबद्दल शहरवासियांनी त्यांचे आभार मानले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत