कोपरगावात राष्ट्रवादीच्या वतीने इंधन दरवाढी विरोधात सायकल रॅली - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावात राष्ट्रवादीच्या वतीने इंधन दरवाढी विरोधात सायकल रॅली

कोपरगाव प्रतिनिधी:-   संपूर्ण देशात इंधनाच्या दरांनी रचलेल्या नव्या विक्रमांनी महागाईचा आगडोंब उसळला असून सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीव...

कोपरगाव प्रतिनिधी:-


  संपूर्ण देशात इंधनाच्या दरांनी रचलेल्या नव्या विक्रमांनी महागाईचा आगडोंब उसळला असून सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन जगणे असह्य झाले आहे. त्यावर केंद्र सरकारकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून या रोषाची माहिती केंद्र सरकार पर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारचा निषेध म्हणून बुधवार (दि.२०) रोजी आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल रॅली काढून पेट्रोल पंपाला हार घालून दरवाढीचा निषेध करण्यात आला.





                 डॉ.बाबसाहेब आंबेडकर स्मारकापासून ते एस. जी. विद्यालय, श्री छत्रपती संभाजी स्मारक, आण्णाभाऊ साठे स्मारक, बसस्थानक ते तहसील कार्यालय अशी सायकल रॅली काढून इंधनाचे लवकरात लवकर कमी करावे अशा आशयाचे निवेदन तहसीलदार विजय बोरुडे यांना निवेदन देण्यात आले आहे.


                यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, शहराध्यक्ष नवाज कुरेशी, नगरसेवक मंदार पहाडे, हाजीमेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, दिनकर खरे, फकिर कुरेशी, रावसाहेब साठे, जावेद शेख, राहुल देवळालीकर, प्रकाश दुशिंग, वाल्मीक लहिरे, संदीप कपिले, राजेंद्र खैरनार, संदीप सावतडकर, अशोक आव्हाटे, इम्तियाज अत्तार, संतोष वढणे, सागर लकारे, फिरोज पठाण, योगेश नरोडे, राकेश शहा, रोशन शेजवळ, पुंडलिक वायखिंडे, भीमराव दहे, संतोष शेलार, अक्षय आंग्रे, दिनेश संत, संतोष शेजवळ, गणेश बोरुडे, कैलास महालकर, लक्ष्मण सताळे, हारूण शेख, तेजस साबळे, अझर शेख, किशोर डोखे, नितीन जाधव, आकाश जगताप, राजु ठाकरे, रितेश राऊत, ओंकार वढणे, असिफ शेख, निलेश शिंदे आदी उपस्थित होते.


         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत