पारनेर/वेबटीम:- पारनेर शहरात ३९ वा दुर्गामाता नवरात्र महोत्सव साजरा करत असताना विजयादशमीच्या आरतीचा मान रिवाजाप्रमाणे तालुक्याच्या लोकप्रतिन...
पारनेर/वेबटीम:-
पारनेर शहरात ३९ वा दुर्गामाता नवरात्र महोत्सव साजरा करत असताना विजयादशमीच्या आरतीचा मान रिवाजाप्रमाणे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना होता. आ. नीलेश लंके यांना मंडळाने आमंत्रणही दिले. या दिवशी त्यांचे तब्बल २२५ कार्यक्रम होते. सायंकाळचा कार्यक्रम तर मोहटादेवी संस्थानने कधीच बुक करून ठेवला होता. पारनेर शहरातील मानाच्या आरतीला उपस्थित राहील हा शब्द त्यांनी दिला, व तो पाळलाही. नेहमीच लोकांच्या गराड्यात असणारे, दिवसभर कार्यक्रमात व्यस्त असतानाही आमदार १५ मिनिटे अगोदरच पारनेरमध्ये पोहचले.
आरतीला पोहचलेल्या आमदार लंके यांच्या चेहऱ्यावर प्रचंड थकवा जाणवत होता. त्यांना तर ९ दिवसांचा उपवास होता. त्या काळातही रोजचे कार्यक्रम सुरूच होते. पायात चप्पल नाही, उपवास सोडला की नाही, हे देखील माहिती नाही. या कार्यक्रमाला आमदारांचे वडील, आई देखील आले होते. आरतीनंतर थकलेल्या लेकाकडे पाहून आई म्हणाली " घरी चल" मात्र हा अवलिया भेटीस येणाऱ्या लोकांचे प्रश्न सोडविण्यातच मग्न होता !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत