शासनाने पहिली ते पाचवी वर्ग सुरू करण्यास परवानगी द्यावी- सुनील होन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शासनाने पहिली ते पाचवी वर्ग सुरू करण्यास परवानगी द्यावी- सुनील होन

कोपरगाव प्रतिनिधी :- कोरोना महामारीने जगावर संकट ओढवलेले आहे कोरोनाचा वाढता प्रभाव बघून शासनाने शाळा व महाविद्यालय बंद करण्यात आली होती तेव्...

कोपरगाव प्रतिनिधी :-

कोरोना महामारीने जगावर संकट ओढवलेले आहे कोरोनाचा वाढता प्रभाव बघून शासनाने शाळा व महाविद्यालय बंद करण्यात आली होती तेव्हा ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवले व विद्यार्थ्यांना प्रवाह मध्ये टिकवून काम शाळेने अहोरात्र केले.




कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर गेल्या काही दिवसापासून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी ते बारावी वर्ग काही नियम व अटी च्या अधीन राहुन चालू केले.

  त्याच नियमाच्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकानी  शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सॅनिटायझर वापर, मास्क लावणे, वारंवार हात धुणे, एका बेंचवर एक विद्यार्थी याकडे  बारकाईने लक्ष देत शाळा कॉलेज सुरू केले  आहे. 

   बहुतेक भागात शाळा कॉलेज सुरळीत सुरू झाले आसुन त्यामुळे शासनाने आता उर्वरित वर्ग म्हणजे पहिली ते पाचवी हे दिवाळी नंतर चालू करावे व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे. ऑनलाइन पद्धतीने या विद्यार्थ्यांना  शिक्षण चालू आहे पण ऑनलाईन पद्धतीने अनेक अडचणींना शिक्षक व विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. पहिली ते पाचवी वर्ग शाळेचा पाया आहे या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षणाची गरज आहे तेव्हा शासनाने वेळीच उपाय योजना करून पहिली ते पाचवी वर्ग लवकरात लवकर सुरू करावे  असे मत चांदेकसारे येथील जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूलचे सचिव सुनील होन  यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाद्वारे  केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत