संजय सातभाई यांच्या वाढदिवसानिमित्त दिवाळी मेळाव्याचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संजय सातभाई यांच्या वाढदिवसानिमित्त दिवाळी मेळाव्याचे आयोजन

कोपरगाव/प्रतिनिधी कोपरगावचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांच्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण सभा व ब्राह्मण युवाशक्ती यांच्यावतीने रविवारी (ता.3...

कोपरगाव/प्रतिनिधी


कोपरगावचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांच्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण सभा व ब्राह्मण युवाशक्ती यांच्यावतीने रविवारी (ता.31) दिवाळी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ब्राह्मण समाजातील छोट्या व मोठ्या व्यावसायिकांसाठी 15 लोकांना पूर्णतः मोफत स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.


माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांनी कायमच समाजाच्या हितासाठी काम केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण सभा व ब्राह्मण युवाशक्ती यांच्यावतीने रविवारी (ता.31) दिवाळी मेळाव्याचे श्रीरामनगर येथील ब्राह्मण सभागृहात सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आलेले आहे.


 यामध्ये 15 लोकांना पूर्णतः मोफत स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यात दिवाळी तयार फराळ विक्री, बनविलेले आकाश कंदील विक्री, रांगोळी विक्री, इलेक्ट्रीक वस्तू विक्री, रेडिमेड कपडे/साडी विक्री, लहान मुलांचे कपडे, रेडीमेड मिठाई, पणत्या/दिवे, लक्ष्मी मूर्ती/बोळके, अत्तर /परफ्युम/अगरबत्ती विक्री असे अनेक स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 


तसेच वडे, पाणीपुरी, कच्छी दाबेली, भजी असे बनवून विकणार्‍यांना देखील स्टॉल उपलब्ध करुन दिले जाणार आहे. स्टॉल बुकिंगसाठी शनिवार दि.30 ऑक्टोबर शेवटची तारीख आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत