राहुरी प्रतिनिधी अखिल भारतीय छावा संघटना राहुरी शहर प्रमुखपदी अमोल पवार पाटील यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे (नांदेड...
राहुरी प्रतिनिधी
अखिल भारतीय छावा संघटना राहुरी शहर प्रमुखपदी अमोल पवार पाटील यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे (नांदेड) यांच्या हस्ते केंद्रीय अध्यक्ष श्री.नानासाहेब जावळे पाटील यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आली आहे.
या वेळी राज्य संपर्क प्रमुख प्रताप कांचन (सोलापूर), संघटक अशोक चव्हाण,आशिष खंडेलवाल ,संभाजीनगर जिल्हा प्रमुख अशोक मोरे नगर जिल्हा प्रमुख पटारे, जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री देवेंद्र एस. लांबे-पाटील ,महिला जिल्हा प्रमुख सुरेखाताई सांगळे,मिनाक्षी ताई जाधव,शेतकरी नेते निलेश दादा बनकर, जिल्हा संघटक प्रवीण देवकर आदी उपस्थित होते.
अमोल पवार यांनी आज पर्यंत अ.भा.छावा संघटनेचे संस्थापक कै.अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या विचारांवर सामाजिक उपक्रम राबवत आलेले आहेत.
भविष्यकाळात समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी पदाचा उपयोग करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत