राहुरी/वेबटीम:- डॉ.सुषमा आचारी यांनी नेपाळ येते झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश मिळवले. नेपाळ येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ,धाव...
राहुरी/वेबटीम:-
डॉ.सुषमा आचारी यांनी नेपाळ येते झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश मिळवले. नेपाळ येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ,धावणे, पोहणे या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवले . आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून त्यांनी कोपरगाव ची मान देशभरात व जगभरात भारताची मान उंचावली आहे . त्यांचा स्पर्धेमध्ये झालेला विजय हा तरुणांना दिशा दर्शक आहे .असे प्रतिपादन प्रेरणा फाउंडेशन चे अध्यक्ष ॲड. मनोज कडू यांनी केले .
त्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल प्रेरणा फाउंडेशन प्रणित ज्येष्ठ नागरिक मंच चे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रेरणा फाउंडेशन चे अध्यक्ष ॲड. मनोज कडू, प्रेरणा फाउंडेशन प्रणित ज्येष्ठ नागरिक मंच चे पदाधिकारी उपाध्यक्ष श्री. सुवलाल भंडारी,. खजिनदार श्री.मोहनलाल तिवारी,. सचिव श्री. छबुराव नजन , सौ.सुनीता चीने .श्री दिलीप चिने, श्री. नंदकुमार लोंगाणी . श्री .बाळासाहेब कडू . डॉ.विलास आचारी..श्री . खैरनार , श्री.सुभाष जोशी गुरू,ॲड.रश्मी कडू आदीं प्रेरणा फाउंडेशन चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत