तरुणांच्या आर्थिक सक्षमिकरणासाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडची धडफड सुरूच- पाटील - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

तरुणांच्या आर्थिक सक्षमिकरणासाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडची धडफड सुरूच- पाटील

कोपरगाव(वेबटीम):- कोपरगाव तालुका संभाजी ब्रिगेड अध्यक्ष पदी शिवश्री. चंद्रशेखर म्हस्के व शहर अध्यक्ष पदी शिवश्री.निखिल डांगे यांची निवड झाल्...

कोपरगाव(वेबटीम):-

कोपरगाव तालुका संभाजी ब्रिगेड अध्यक्ष पदी शिवश्री. चंद्रशेखर म्हस्के व शहर अध्यक्ष पदी शिवश्री.निखिल डांगे यांची निवड झाल्याबद्धल त्यांचा सत्कार माजी मराठा सेवा संघ तालुकाअध्यक्ष मंगेश पाटील व मराठा महासंघाचे माजी. उपतालुकाप्रमुख बाळासाहेब देवकर यांचे हस्ते सत्कार कऱण्यात आला.

 या वेळी , प्रत्येक तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा हे ध्येय उराशी बाळगून मराठा सेवा संघ - संभाजी ब्रिगेड एक नवी दिशा आणि नवा विचार देणारे कार्य यापुढे करणार आहे असे प्रतिपादन माजी तालुकाअध्यक्ष मंगेश पाटील यांनी केले.




         “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुख आपला” हा विचार तरुणांमध्ये रुजवून त्यांना जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण या विषयांचे भान देणारे मार्गदर्शन आणि व्यावसायिक मेळावे अशाप्रकारचे कार्यक्रम राबविणार आहेत.

मराठा सेवा संघाचे.संभाजी ब्रिगेड  प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड, राज्य संपर्कप्रमुख दशरथ गव्हाणे, जिल्हाध्यक्ष संतोष भागडे यांनी या दोघांची निवड केली.त्याबद्धल सर्वे स्तरातून श्री.म्हस्के व श्री.डांगे  यांना सर्वजन शुभेच्छा देत आहेत.लवकरच शहर व तालुक्यातील नवीन पदाधिकारी याची निवड , नवीन दोन्ही पदाधीकारी करणार आहेत असे म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत