कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरातील द्वारका नगरी, सह्याद्री कॉलनी व शंकर नगर मधील काही ठिकाणी स्ट्रीट लाईट नसल्याने या भागात सतत अंधार...
कोपरगाव शहर प्रतिनिधी-
कोपरगाव शहरातील द्वारका नगरी, सह्याद्री कॉलनी व शंकर नगर मधील काही ठिकाणी स्ट्रीट लाईट नसल्याने या भागात सतत अंधार असतो त्या मुळे स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते त्या मुळे लवकरात लवकर कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने सदर भागात स्ट्रीट लाईट पोल बसविण्यात यावे अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदीप कपिले यांनी स्थानिक नागरिकांनसह नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिले आहे
या निवेदनावर विजय आदमाने, बाळासाहेब चांदगुडे, गोरक्षनाथ पंडोरे,गौरी आनंद, दत्तात्रय देशमुख, बाळासाहेब जोरी, धनंजय भुजबळ,अखिलेश समधडीया, उमेश नाईक, गणेश दाभाडे, निवृत्ती भागवत, नानासाहेब पवार, रामदास गवळी, भानुदास लांडे, जी.एम. वट्टमवार रविंद्रा आकारे, राजेंद्र पानसरे, राजेंद्र पोटे, बबन शिंगाडे, प्रकाश सूर्यवंशी आदी स्थानिक नागरिकांच्या सह्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत