कोपरगाव/प्रतिनिधी:- सामाजिक कार्यकर्ते तथा भूमिपुत्र फाउंडेशनचे निसार शेख यांच्या भगिनी आदर्श शिक्षिका, कावयित्री दिलशाद सय्यद आणि शबाना तां...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
सामाजिक कार्यकर्ते तथा भूमिपुत्र फाउंडेशनचे निसार शेख यांच्या भगिनी आदर्श शिक्षिका, कावयित्री दिलशाद सय्यद आणि शबाना तांबोळी यांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल रविवारी (ता.३) यथोचित सन्मान करण्यात आला.
अकोले येथील ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका, कवयित्री तथा सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांच्या भगिनी दिलशाद सय्यद यांच्यासह पढेगाव जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका शबाना तांबोळी यांना नुकताच राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल भूमिपुत्र फाउंडेशनच्यावतीने त्यांचा शाल व पुष्पहार घालून यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षिका सय्यद यांनी लिहिलेल्या 'रंग उन्हाचे' या पुस्तकाचे प्रकाशन सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निसार शेख, हाजी मन्सूर शेख, प्राध्यापक यासिन सय्यद, एडव्होकेट समीर शेख, माजिद पठाण, इम्रान शेख, सुनील बोऱ्हाडे, आसिफ पठाण, अर्षद पठाण, साहिल सय्यद, काजिम शेख आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत