साठवणीतील आठवणी या पुस्तिकेचे मा खासदार श्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते प्रकाशन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

साठवणीतील आठवणी या पुस्तिकेचे मा खासदार श्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते प्रकाशन

कोपरगाव/वेबटीम: - महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने २०१६ मध्ये आरबीआयवर  काढलेले मोर्चे आणि आंदोलनाने पतसंस्थांचे विविध प्रश्न सोडव...

कोपरगाव/वेबटीम:-

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने २०१६ मध्ये आरबीआयवर  काढलेले मोर्चे आणि आंदोलनाने पतसंस्थांचे विविध प्रश्न सोडविले गेले होते.आजही महाराष्ट्र राज्य फेडरेशनच्या माध्यमातून काका कोयटे पतसंस्था चळवळ अधिक बळकट करीत असून महाराष्ट्रात पतसंस्था  संख्यात्मकदृष्ट्या अधिक असून सहकार खात्याविषयी  येणाऱ्या विविध अडचणींवर चर्चा करून मार्ग काढावेत आणि वेळ प्रसंगी आंदोलने,मोर्चे काढावेत. माझे सतत काका कोयटे आणि त्यांच्या राज्य फेडरेशनला सहकार्य असेल.

तसेच महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपद भूषवित असताना काका कोयटे यांनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली असून साठवणीतील आठवणी हे पुस्तक त्यांनी केलेल्या कामाचा पुरावा आहे. असे गौरवोद्गार सहकाराची जाण असलेले,सहकाराचे नेते मा खासदार श्री शरदचंद्रजी पवार यांनी काढले.



      ए. आर. ऑफीस पासून ते मंत्रालयापर्यंत,बंद पडलेल्या बँकेपासून ते रिझर्व्ह बँकेपर्यंत आंदोलने आणि मोर्चे तसेच सामान्य पतसंस्थांपासून ते केंद्रीय अर्थमंत्र्यांपर्यंत आणि ग्रामीण भागातील पतसंस्थांपासून ते परदेशातील पतसंस्थांपर्यंतच्या भेटी घेऊन पतसंस्था चळवळीतील विविध प्रश्न, समस्यांची सोडवणूक मोर्चे,आंदोलनाच्या माध्यमातून करत महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांचा अध्यक्षीय कारकिर्दीचा प्रवास दाखविणारे *साठवणीतील आठवणी* या पुस्तिकेचे प्रकाशन सहकाराची जाण असणारे, सहकाराचे नेते *मा. खासदार शरदचंद्रजी पवार* यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

      सदर पुस्तकाविषयी मा श्री शरदचंद्रजी पवार यांना राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी माहिती दिली असता फेडरेशनच्या अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांना आज पतसंस्थांना येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी दिल्लीला येण्याचे आमंत्रण दिले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

    प्रसंगी मा. प्रतापरावजी पवार,महाराष्ट्र  राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष मा.श्री विद्याधरजी अनास्कर,महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे,अहमदनगर जिल्ह्य स्थैर्य निधीचे अध्यक्ष व श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त मा. श्री सुरेशजी वाबळे, मा. शांतीलालजी सिंगी, मा. सुदर्शनजी भालेराव, सौ. सुरेखा लवांडे तसेच राज्य फेडरेशनचे पदाधिकारी, पतसंस्था चळवळीतील पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत