राहुरी/वेबटीम:- वयोवृद्धांसाठी विविध योजना सुरू करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी वयोवृद्धांना आधार देण्याचे काम केले आहे. या योजन...
राहुरी/वेबटीम:-
वयोवृद्धांसाठी विविध योजना सुरू करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी वयोवृद्धांना आधार देण्याचे काम केले आहे. या योजना वयोवृद्धांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आपापल्या स्तरावर युवक व कार्यकर्त्यांनी योगदान देऊन या योजनांचा लाभ त्यांना मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी केले आहे.
राहुरी शहरातील प्रगती विद्यालया मध्ये आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ६०वर्षावरील सर्व नागरिकांसाठी व डॉ विखे पाटील फौंडेशन संचलित जिल्हा अपंग (दिव्याग)पुनर्वसन केंद्र अहमदनगर,व जिल्हा कल्याण समाज विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत"मोफत सहायक साधने वाटपासाठी तपासणी शिबिराचे आयोजन रविवार दिनांक तीन ऑक्टोबर व सोमवार दिनांक 4 ऑक्टोबर याादरम्यान करण्यात आलेली आहे.
या शिबिराचा शुभारंभ खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांच्या शुभहस्ते तसेच राहुरी कारखान्याचे उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस, रावसाहेब चाचा तनपुरे,भाजपचे तालुका अध्यक्ष अमोल भनगडे,शहर अध्यक्ष राजेंद्र उंडे, राहुरी कारखान्याचे संचालक शामराव निमसे, शिवाजी सयाजी गाडे , केशवराव कोळसे पाटील, मुळा प्रवराचे संचालक आर.आर.तनपुरे प्रफुल्ल शेळके ,गणेश खैरे, नयन शिंगी सोन्याबापु जगधने ,अण्णासाहेब शेटे नानासाहेेब गागरे, डॉ. संजय भळगट सर्जेराव घाडगे ,ढोकणे सर ,नारायण धोंडगे ,युवराज गाडे ,जब्बार भाई पठाण, प्रदीप पवार, बिलाल शेख अतिक बागवान ,अजित डावखर डॉ.मेरीकर आदींच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडला.
यावेळी बोलताना खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी सांगितले की, ही योजना मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधणारी आहे. अनेक वृद्धांना आपल्या विशिष्ट वयानंतर अनेक शारीरिक अडचणी येत असतात त्याचे निराकरण करून वयोवृद्धांना आवश्यक त्या वस्तू या शिबिराच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मदत मिळणे अधिक सोपे आहे वयोवृद्धांना आधार देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी अनेक योजना आखलेल्या आहेत त्यामागे त्यांचा दूरदृष्टी कोण आहे ही कोणतीही शो बाजी नाही या वयोवृद्धांचे आशीर्वाद भविष्यात नक्कीच कामी येणारे आहेत.
युवकांनी या योजना वृद्धांना समजून सांगितल्या पाहिजेत व पुढाकार घेऊन कार्यकर्त्यांनी व युवकांनी या वृद्धांना शिबिराच्या ठिकाणी घेऊन येणे गरजेचे आहे शिबिराचे आयोजन केले गेले असले तरी या वृद्धांच्या वाहतुकीचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने सर्वांनी त्यांना सर्व परीने मदत करून शिबीर स्थळी घेऊन आले पाहिजे व त्यांना आवश्यक ते साहित्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आम्ही हा कॅम्प राजकीय स्वार्थापोटी आयोजित केलेला नाही. सर्वांनी आपापल्या स्तरावर योगदान देऊन जास्तीत जास्त वृद्धांना याचा लाभ मिळवून द्यावा याची सुरुवात आपल्या घरापासून करावी या शिबिरातून माणूस हसत बाहेर गेला की शिबिर यशस्वी झाल्याचे समाधान आम्हाला लागणार आहे. शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेची गरज असणाऱ्या रुग्णांवर विळद घाट येथे मोफत दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच आलेल्या सर्वच वयोवृद्धांना त्यांच्या गरजेनुसार साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी मोफत लसीकरण करून कोट्यावधींचे प्राण वाचवले आहेत त्यामुळे त्यांच्यासमवेत काम करण्यात आम्हाला नेहमी समाधान मिळते. गणपती नवरात्रासाठी गोळा केलेल्या वर्गणीतून वयोवृद्धांना या शिबिरात आणण्यासाठी विविध मंडळांनी देखील पुढाकार घ्यावा तसेच या शिबिराचा सर्वच वयोवृद्धांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत