कोपरगाव/प्रतिनिधी:- माजी आमदार अशोक काळे यांच्या प्रेरणेतून आणि आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषीकेश खैरनार मित्रमंडळ आणि श्री...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
माजी आमदार अशोक काळे यांच्या प्रेरणेतून आणि आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषीकेश खैरनार मित्रमंडळ आणि श्री जनार्दन स्वामी महाराज रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील संत सेना महाराज मंदिरात रविवारी (ता.३) मोफत अस्थिरोग, नेत्ररोग व दंतरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत तब्बल ३४६ गरजूंनी लाभ घेतला असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या शिबिरात श्री जनार्दन स्वामी महाराज रुग्णालयाचे संचालक प्रसाद कातकडे, डॉ.विशाल काळे, डॉ.प्रशांत सगळगिरे, डॉ. पूजा कातकडे, डॉ.दर्शना गंगवाल या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून मोफत औषध वाटप केले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे सुनील खैरनार, धरम बागरेचा, सुनील गंगुले, बाळासाहेब रुईकर, वीरेन बोरावके, मंदार पहाडे, सुनील शिलेदार, संदीप पगारे, मुकुंद भुतडा, राकेश शहा, गणेश लकारे, सुनील बोरा, डॉ.तुषार गलांडे, राजेंद्र वाघचौरे, मेहमूद सय्यद, फकीर कुरेशी, जावेद शेख, संदीप कपिले, भावेश थोरात, सुनील फंड, फिरोज पठाण, कलविंदर दडियाल, भारत मोरे, विक्रांत झावरे, गगन हाडा, विजय वाजे, राहुल देवळालीकर,
दीपक गायकवाड, लक्ष्मण सताळे, आनंद जगताप, रवी राऊत, बंटी लोट, साई गवळी, रोहित साळुंके, सोनू बागुल, संतोष तोरपे, विकी जोशी, बाळा देवकर, पप्पू गोसावी, आकाश डागा, सचिन खैरनार, पीयूष गंगवाल, वाल्मिक लाहिरे, संदीप देवळालीकर, संतोष बारसे, रोहित खंडागळे, रितेश राऊत, पीयूष सैंदाणे, सनी पवार, यश सोनवणे, सुनीता खैरनार, सिद्धी शिवाळ, स्वाती जिरे, अंजली बेलदार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन महेश उदावंत यांनी केले. या उपक्रमाबद्दल ऋषीकेश खैरनार मित्रमंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत