डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी आरपीआय आंबेडकर गटाचे ग्रामपंचायतिला निवेदन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी आरपीआय आंबेडकर गटाचे ग्रामपंचायतिला निवेदन

राहुरी(वेबटीम):- वांबोरी गावातील दलित वस्तीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारावे या मागणीचे निवेदन आज आरपीआय आंबेडकर गटाचे राहुरी ...

राहुरी(वेबटीम):-


वांबोरी गावातील दलित वस्तीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारावे या मागणीचे निवेदन आज आरपीआय आंबेडकर गटाचे राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतला निवेदन दिले आहे.


 ग्रामपंचायतीच्या सरपंच यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले की, वांबोरी गावात दलित समाज बांधवांची सँख्या मोठी असल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक  होणे गरजेचे आहे. समाजातील मुले, मुली व वृद्ध माणसे यांना स्मारकाचा फायदा होणार आहे. वांबोरी गावात भव्य आंबेडकर स्मारक उभारावे देणेकरून गोरगरीब जनतेचे साखरपुडा, विवाह, समाज प्रबोधनाचे काम होणार आहे.


तरी लवकरात लवकर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भवन लवकरात लवकर उभारण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, सरपंच किरण ससाणे, उपसरपंच मंदाताई भिटे, ईश्वर भिटे आदी उपस्थित होते.


यावेळी निवेदनावर आरपीआय आंबेडकर गटाचे तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे, माजी ग्रामपंचायत सदस्य सूरज मकासरे, नितीन ब्राम्हणे, विवेक नवले,  संजय बांबळ, अतिश मकासरे, विशाल मकासरे, सुहास मकासरे, अक्षय दळवी, स्वप्नील भांबळ,  किरण खरात, समीर शेख, तन्वीर शेख, राकेश पवार, प्रशांत मकासरे, राहुल जाधव, सचिन मकासरे,  किशोर मकासरे, सागर मकासरे, आकाश मकासरे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत